शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कलावंताना मानधन मिळावे यासाठी धुळे जि.प. सीईओंच्या दालनासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 17:34 IST

विविध मागण्या, ६० कलावंताना पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही

ठळक मुद्देविविध क्षेत्रातील कलावंताचे विविध प्रश्न प्रलंबितलोककल्याणकारी कार्यक्रम मानधन तत्वावर मिळत नाही.जिल्हा परिषदेचे कर्मचारी अरेरावीने उत्तरे देतात

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यातील ६० कलावंताची मानधनासाठी निवड झाली असून, त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. हे थकीत मानधन मिळावे, कलावंताच्या मानधनात वाढ करावी, प्रतिवर्षी कलावंताचे ३०० प्रस्ताव मंजूर झाले पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सीईओंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शाहीर कलावंत, साहित्तीक, कवि, लेखक, तमाशा कलावंत, वारकरी संप्रदाय (भजनी मंडळ), एकतारी लोककलावंत, गोंधळी, वाघ्या मुरळी, जोगती, यासह विविध क्षेत्रातील कलावंताचे विविध प्रश्न प्रलंबित आहे. निवड होऊन मानधन नाहीजिल्ह्यातील ६० कलावंताची सप्टेंबर १८ पासून मानधनासाठी निवड करण्यात आलेली आहे. मात्र त्यांना पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. ते मानधन त्वरित मिळावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तालुका व जिल्हा स्तरावर कलावंताना शासनाच्या विविध योजनांचे लोककल्याणकारी कार्यक्रम मानधन तत्वावर मिळत नाही. त्याबाबत या कार्यालयाशी संपर्क साधला असता, जिल्हा परिषदेचे कर्मचारी अरेरावीने उत्तरे देतात, अपमान करतात. तसेच तालुकास्तरावर वृद्ध कलावंताना शासनाच्या मानधन प्रस्तावाबाबत पोच अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कलावंतावर अन्याय होत आहे. ठिय्या आंदोलनाप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप, फुला गवळे, वसंत कुवर, निंबा चौधरी, भाईदास गवळे, रवींद्र पाटील, ताराचंद गवळे, त्र्यंबक जगदाळे, काशिनाथ गवळे, नथ्थु साळुंके, खंडू वानखेडे, आसाराम अहिरे, शंकर मोरे, अशोक निकुंभ, पंडीत बोढरे, निंबा बेडसे, दिगंबर वाघ, हिंमत पवार, भालेराव पाटील, पांडुरंग वाघ, राजेंद्र वाघ, रजेसिंग गिरासे, वेडुसिंग गिरासे, दीपक महाजन आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे