शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हयात दोन दिवसात चार हजार नवमतदारांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 11:43 IST

मतदार नोंदणी विशेष मोहीम, अनेकठिकाणी चांगला प्रतिसाद

ठळक मुद्देजिल्ह्यात २ व ३ मार्च रोजी राबविली विशेष मोहीमअनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद

आॅनलाइन लोकमतधुळे :आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्ह्यात दोन दिवस मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. यात दोन दिवसात ४ हजार ४७ मतदारांनी नाव नोंदणी केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रात २ व ३ रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१९ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ३१ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडून लोकसभा मतदार संघासाठी मतदार यादी जाहिर करण्यात आली. त्यानंतर फेबु्वारीमध्ये ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांच्यासाठी दोन दिवस मोहिम राबविण्यात आली होती. मात्र या मोहिमेनंतरही काही जणांचे नावनोंदणी करण्याचे राहून गेले होते.त्यांच्यासाठी आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाभरात २ व ३ मार्च रोजी मतदार केंद्रावर बीएलओ मार्फत नवमतदार नावनोंदणी मोहिम राबविली. त्यात पहिल्या दिवशी १ हजार २०० जणांनी तर तर दुसºया दिवशी जवळपास २ हजार ८०० मतदारांकडून नावनोंदणी करण्यात आली. एकूणच या मोहिमेला नवतरूण मतदारांसह इतराकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवसात ४ हजार ४७ मतदारांकडून नावनोंदणीसाठी अर्ज क्रमांक ६ भरून दिले आहे. त्यात २ हजार ३२१ पुरूष तर २ हजार ६ महिला मतदाराचा समावेश आहे. त्यांचे नावे आता संगणकात अपलोड करून पुरवणी यादीत संबंधिताच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहेत. दरम्यान,शहरातील काही मतदान केंद्रावर बीएलओ उपस्थित नसल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यासंदर्भात संबंधितांविरूध्द कारवाई करण्याचेही संकेत प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे. अजूनही नावनोंदणीची प्रक्रिया ही निवडणुकीच्या घोषणेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे अजूनही कोणी नावनोंदणीपासून वंचित राहिला असेल त्यांनी संबंधित बीएलओशी संपर्क साधून अथवा तहसिलदार कार्यालयात नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीDhuleधुळे