शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात संततधार, मोठ्या विसर्गामुळे पांझरा, बुराई, अनेर व अरुणावती नद्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:55 IST

शिरपूर तालुक्यात मातीचे धरण फुटले, शिंदखेड्यात शाळांना सुटी, अनेक गावांचा संपर्क तुटला, शिरपूर, कासाऱ्यात दुकानांमध्ये पाणी

धुळे : जिल्ह्यात संततधार सुरूच असून रात्री जिल्ह्यात बहुतांश मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आले आहेत. शिरपूर तालुक्यात फत्तेपूर फॉरेस्ट येथील मातीचे धरण (बंधारा) फुटल्याने पाणी वाहून जात आहे. अक्कलपाडा धरणाचे सकाळी सात दरवाजे उघडल्याने पांझरा नदीपात्रात ५५ हजार क्युसेस, अनेर धरणातून ४० हजार क्युसेस तर बुराई धरणातून ९ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होत असून या नद्यांना मोठे पूर आले आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.बुराई नदीला कित्येक वर्षांनंतर आलेल्या पुरामुळे शिंदखेडा तालुक्यात शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. पांझरा नदीच्या पुरामुळे आल्याने साक्री तालुक्यातील कासारे येथे बाजारपेठेसह दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. कासारे येथे आतापर्यंतच सर्वात मोठा पूर आल्याचे सांगितले जात आहे. साक्री तालुक्यातील फोफादे गावाचा बुराई नदीच्या पुरामुळे तालुक्याशी संपर्क तुटला आहे. अनेर व अरुणावती नद्यांना पूर आल्याने शिरपूर शहरात हाहाकार उडाला आहे. दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शिरपूर पॅटर्नने बांधलेले सर्व बंधारे ‘ओव्हरफ्लो’ झाले असून अनेर धरणातून ४० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे शिंदखेडा तालुक्यातील अमरावती धरण भरण्याच्या मार्गावर आहे. भरल्यानंतर त्यातूनही विसर्ग केला जाणार आहे.धुळे तालुक्यातील नेर येथे गुरूवारी पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली होती. शुक्रवारी पूरस्थिती कायम असल्याने काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येत असून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. स्थितीचा आढावा घेण्यासाठी तेथे पोहचले आहेत. नद्यांच्या विसर्गांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याच्या सूचना दिल्या असून स्थितीचा आढावा घेतला जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे