शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषदेतर्फे २० शेतकºयांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 15:43 IST

कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी, शेकडो शेतकरी उपस्थित

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे आयोजनप्रथमच झाला पुरस्कार वितरण सोहळाशेतकºयांनीही केले मार्गदर्शन

आॅनलाइन लोकमतधुळे : कृषी क्षेत्रात उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाºया जिल्ह्यातील २० शेतकºयांचा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे आज  सन्मान करण्यात आला. यात सहा महिला शेतकºयांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते होते. उदघाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., होते. व्यासपीठावर   उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, कृषी व पशुसंवर्धन सभापती लिलावती बेडसे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती नूतन निकुम,  जि.प. सदस्या राजपूत, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, पराग बेडसे, किरण पाटील आदी होते. या कार्यक्रमात सुवर्णमाला संभाजीराव देशमुख (चिंचवार), नामदेव लालसिंग सोनवणे (भिल) (फागणे), रवींद्र भिवसन पाटील (विसरणे), जयेश भरत पवार (वलवाडी), हकुमचंद वना माळी (बोरकुंड),  निर्मला ओंका मावची (चरणमाळ), स्वरूपसिंग जोम्या गावीत (केळीपाडा), सुक्राम शामू गवळी (बाभळदे), रामचंद्र शंकर सोनवणे (धमनार), जयप्रकाश ब्रिजलाल सिसोदीया (गणेशपूर), निलाबाई भिलाजी पाटील (वनावल), शिवाजी नजºया पावरा (फत्तेपूर), कल्याणसिंग सरदारसिंग राजपूत (भावेर), देवीदास काशिनाथ कोळी (तोंदे), जगदीश वसंत पाटील (बलकुवे), सुभाष विजयसिंग गिरासे (देगाव), अरूणा अनिल गिरासे (शेवाडे), जागृती भिका पाटील (अलाणे), जगमल गुला ठाकरे (सतारे), तिरोणा सुरेश पाटील (डाबली) या २० शेतकºयांचा सत्कार करण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल,श्रीफळ महिला शेतकºयाला साडीचोळी तर पुरूष शेतकºयाला ड्रेस देवून गौरविण्यात आले.या वेळी बोलतांना गंगाथरन देवराजन म्हणाले की, आपण शेती करतो याचा शेतकºयाला अभिमान वाटला पाहिजे. शहरी भागातील नागरिकाला आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जीम मध्ये जावे लागते, मॉर्निग वॉकला जावे लागते. मात्र शेतकरी हा शेतात कबाडकष्ट करतो, घाम गाळतो त्यामुळे त्याचे आरोग्य नेहमीच सुदृढ राहते. शेतकरी हा खºया अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. शिवाजी दहिते म्हणाले, शेतकºयांचे मार्गदर्शन हे दिशा देणारे आहेत. शेतकºयांना वीज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी प्रल्हाद सोनवणे यांनी केले. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.  

टॅग्स :Dhuleधुळे