शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे ९३४ स्त्रिया मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 11:40 IST

निवडणूक शाखा : विधानसभा मतदार संघाची यादी अद्ययावत; १५ लाख ६७ हजार १९१ मतदार संख्या 

ठळक मुद्देजिल्ह्यात मतदारांची नव्याने नोंदणी,  धुळे शहर विधानसभा मतदारसंघात स्त्री मतदारांची संख्या कमी जिल्ह्यात मतदारांची संख्या  १५ लाख ६७ हजार १९१

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाची यादी जिल्हा निवडणूक शाखेतर्फे अद्ययावत करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांची संख्या ही ९३४ इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विधानसभा मतदार यादीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात मतदारांची संख्या आता १५ लाख ६७ हजार १९१ इतकी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदारांची नव्याने नोंदणी, तसेच दुबार, मयत व स्थलांतरित नावांची वगळणीची मोहीम जिल्ह्यात बीएलओंमार्फत राबविण्यात आली. १ जानेवारी २०१७ पर्यंत जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांसचे प्रमाण हे ९३१ इतके होते. त्यात १ जानेवारी २०१८ पर्यंत या प्रमाणात तीन स्त्री मतदारांची संख्या वाढ झाली आहे. धुळे शहर मतदारसंघात स्त्री मतदारांचे प्रमाण कमी जिल्ह्यात धुळे शहर विधानसभा मतदारसंघात स्त्री मतदारांची संख्या कमी असल्याची बाब दिसून आली आहे. धुळे शहर मतदारसंघात एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांची संख्या ही केवळ ८८७ इतकी आहे. तर उर्वरित धुळे ग्रामीण मतदारसंघात एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांची संख्या  ही ९१७, साक्री ९३६, शिंदखेडा ९३६, शिरपूर ९६४ इतके स्त्री मतदारांचे प्रमाण आहे. तीन नवीन मतदान केंद्रांना मान्यता जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघासाठी १,६३० मतदान केंद्रांची संख्या होती. त्यात निवडणूक आयोगाने धुळे शहर मतदारसंघासाठी आझाद नगर, मिल्लत नगर व चितोड रोड परिसरात अशा तीन नवीन मतदान केंद्रांना मान्यता दिली आहे. त्यामुळे आता  धुळे शहरात २३९ मतदान केंद्रे झाली आहेत. तर साक्री ३६५, धुळे ग्रामीण ३७०, शिंदखेडा ३३५ व शिरपूर तालुक्यात ३२१ मतदान केंद्रे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फोटे अपडेटचे चार टक्के काम प्रलंबित निवडणूक शाखेतर्फे मतदार नोंदणी अभियान राबविताना मतदार यादीत फोटो अपडेटचे कामही प्राधान्याने करण्यात आली. हे काम ९६.९४ टक्के इतके झाले आहे. अद्याप चार टक्के काम प्रलंबित आहे. जिल्ह्याच्या अद्ययावत झालेल्या मतदार यादीत एकूण मतदारांची संख्या ही १५ लाख ६७ हजार हजार १९१ आहे. पैकी १५ लाख १७ हजार ५४४ मतदारांचे फोटो यादीत असून उर्वरित मतदारांचे फोटो यादीत नाहीत. नाव नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरूच राहणार दरम्यान, विधानसभा मतदारसंघाची यादी अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाले असले, तरी नव्याने नाव नोंदणीची निरंतर प्रक्रिया ही सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे. तसेच २५ जानेवारीला राष्टÑीय मतदार दिवसानिमित्त नव्याने नोंदणी करणाºया मतदारांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्मार्ट मतदार ओळखपत्राचे वितरण केले जाणार आहे.  ज्या मतदारांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदणी करून घेतलेली नाही, त्यांनी निरंतर प्रक्रियेंतर्गत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.