शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
2
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
3
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
4
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
5
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
6
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
7
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
8
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
9
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
10
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
11
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
12
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
13
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
14
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
15
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
16
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
17
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
18
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
19
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
20
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात सातव्या जनगणणेसाठी १ हजार प्रगणक नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:05 IST

१ सप्टेंबरपासून सुरू होणार जनगणना

ठळक मुद्देजिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठकबैठकीत जनगणणा मोहिमेची दिली माहिती २५२ पर्यवेक्षकांची नियुक्ती

आॅनलाइन लोकमतधुळे : केंद्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे संपूर्ण देशात सातवी आर्थिक गणना होणार आहे. धुळे जिल्ह्यात एकसप्टेंबरपासून ही गणना सुरू होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी कळविले आहे.सातव्या आर्थिक गणनेसाठी गठित जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी शशांक काळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. ए. तडवी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी महेश खडसे, अपर तहसीलदार सुदाम महाजन (दोंडाईचा), संजय शिंदे (धुळे शहर), किशोर कदम (धुळे ग्रामीण) यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.या गणनेसाठी नियुक्त प्रगणकांमध्ये बहुतांश स्थानिक तरुणांचा समावेश असेल. त्यांना स्थानिक पातळीवर पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, पोलिस आवश्यक तेथे सहकार्य करतील. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदस्तरावर संबंधित वॉर्ड आॅफिसर सहकार्य करतील. तशा सूचना संबंधितांना देण्यात येतील. तसेच तालुकास्तरावर समन्वयक नियुक्त करावा. सर्व प्रगणकांचे प्रशिक्षण घेण्यातयावे, अशाही सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी दिल्या.जिल्हा सांख्यिकी अधिकारी काळे यांनी सांगितले, सातव्या आर्थिक गणनेचे काम एक सप्टेंबरपासूनसुरू होईल. त्यासाठी एक हजारावर प्रगणक, २५२ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.प्रथमच ही गणना माहिती तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर म्हणजेच आॅनलाइन मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे होईल. त्यामुळे माहिती संकलनाचे काम जलदगतीने होईल, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Dhuleधुळे