शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात दहावी, बारावीसाठी ५६ हजार विद्यार्थी प्रविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 11:34 IST

पाच भरारी पथकांची नियुक्ती, नऊ संवेदनशील केंद्र

ठळक मुद्देपाच भरारी पथकांची नियुक्तीजिल्ह्यात ९ संवेदनशील केंद्रपोलिस बंदोबस्त तैनात करणार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यातयेणाºया दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे. इयत्ता बारावीसाठी २५ हजार ८५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. तर इयत्ता दहावीसाठी ३० हजार ४७८ विद्यार्थी असे दोन्ही परीक्षा मिळून ५६ हजार ३३३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले आहेत.इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१८ या कालावधित होणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१८ या कालावधित होणार आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.बारावीसाठी २५ हजार ८८५ तर दहावीसाठी ३० हजार ४७८ असे एकूण ५६ हजार ३३३ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत.बारावीसाठी ४४ केंद्रजिल्ह्यात ४४ केंद्रावर बारावीची परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये ७, धुळे ग्रामीणमध्ये १४, साक्री तालुक्यात ९, शिरपूर तालुक्यात ७, शिंदखेडा तालुक्यात ७  असे एकूण ४४ केंद्रावर परीक्षा होणार आहे.दहावीसाठी ६३ केंद्रइयत्ता दहावीची एकूण ६३ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये १३,  धुळे ग्रामीणमध्ये १७, साक्री तालुक्यात १३, शिरपूर तालुक्यात ९, व शिंदखेडा तालुक्यात ११  अशा एकूण ६३ केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.एक-एक केंद्राची भरगेल्यावर्षी  ४३ केंद्रावर  बारावीची परीक्षा झाली होती. यावर्षी शिंदखेडा तालुक्यात एका केंद्राची भर पडली.त्यामुळे एकूण केंद्राची संख्या ४४ झाली.  तर दहावीसाठी गेल्यावर्षी ६२ केंद्रे होती. यावर्षी साक्री तालुक्यातील एका केंद्राची भर पडलेली आहे. त्यामुळे दहावीच्या केंद्राची संख्या आता ६३ झाली आहे.पाच भरारी पथकांची नियुक्तीपरीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून पाच  भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, डायटच्या प्राचार्या यांचा समावेश असणार आहे.आठ ठिकाणी कस्टडीप्रश्नपत्रिका पुरवठा करण्यासाठी व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण आठ कस्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये  धुळे शहर व ग्रामीणसाठी ३ कस्टडी, साक्री तालुक्यासाठी दोन कस्टडी, शिरपूर तालुक्यासाठी एक कस्टडी, शिंदखेडा तालुक्यासाठी २ कस्टडींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.जिल्ह्यात ९ संवेदनशील केंद्रजिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी   पाच संवेदनशील परीक्षा केंद्रे आहेत. यात धुळे शहर १, धुळे तालुका २ साक्री व शिंदखेड्यात प्रत्येकी एक-एक संवेदनशील केंद्राचा समावेश आहे. तर दहावीसाठी चार संवेदनशील केंद्रे असून त्यात धुळे तालुका १, साक्री तालुका २, शिंदखेड्याच्या एक केंद्राचा समावेश आहे. विशेष म्हणजे शिरपूर तालुक्यात दहावी, बारावीसाठी एकही संवेदनशील केंद्र नाही. तर दहावीसाठी धुळे शहरात एकाही संवेदनशील केंद्र नाही.परीक्षेची तयारी पूर्ण झालेली आहे. यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यात येतील.२० रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षेसंदर्भात पुन्हा आढावा घेणार आहेत.                       -प्रविण अहिरेशिक्षणाधिकारी (माध्यमिक)