शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवारसाठी १५७ गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:31 IST

जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे २०१८-१९ या वर्षासाठी ४५० कामे प्रस्तावित

ठळक मुद्देलघुसिंचन विभागातर्फे ४५० कामे प्रस्तावित३ कोटी २९ लाख रूपये खर्च लागणार३६९ कामांचे अंदाजपत्रक तयार

आॅनलाइन लोकमतधुळे : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, २०१८-१९ या वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे १५७ गावांमध्ये ४५० कामे प्रस्तावित केलेली आहे. त्यासाठी ३ कोटी २९ लाख रूपये खर्च लागण्याची शक्यता आहे.राज्यात सतत उदभवणारी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी ‘पाणी टंचाईमुक्त महाराष्टÑ २०१९’ अंतर्गत राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियान हाती घेतलेले आहे. पहिल्या टप्प्याची कामे पूर्ण शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे हे तिसरे वर्ष आहे.  सन २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील १२९ गावांची निवड करण्यात आली होती. या गावामध्ये एकूण ३ हजार ६०५ कामे मंजूर करण्यात आली होती. पैकी सर्व कामे पूर्ण झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. २०१८-१९ मध्ये ४५० कामे प्रस्तावित जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात जलयुक्तच्या कामांसाठी १५७ गावांची निवड करण्यात आलेली आहे. यात नवीन साठवण बंधारे बांधणे, रिजार्ज बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे साठवण बंधारे, गाव तलाव, पाझर तराव, गाळ काढणे, खोलीकरण करणे आदी कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.सर्वाधिक कामे साक्री तालुक्यातया १५७ पैकी सर्वाधिक कामे साक्री तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या तालुक्यात ७३ गावांमध्ये २५ नवीन साठवण बंधारे, ४० रिचार्ज बंधारे, ५४ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, २९ गाव तलाव, पाझर तलाव व १६ गाळ काढणे,खोलीकरण करणे अशी १६४ कामे प्रस्तावित  आहेत. त्या खालोखाल धुळे तालुक्यातील ४२ गावांची निवड करण्यात आलेली असून, त्यात ९ नवीन साठवण बंधारे, ६९ रिचार्ज बंधारे, ६१ कोल्हापूर पद्धतीचे साठवण बंधारे, १६ गाव तलाव व पाझर तलावातील गाळ काढण्याची कामे अशी एकूण १५५ कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे.दुष्काळाची तीव्रता यावर्षी सर्वाधिक शिंदखेडा तालुक्यात आहे. मात्र या तालुक्यातील फक्त १९ गावांची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या तालुक्यात फक्त ७ नवीन साठवण बंधारे, ४ रिचार्ग बंधारे, व १३ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, २२ गाव तलाव, पाझर तलाव व ६ ठिकाणचे गाळ काढणे खोलीकरण अशी एकूण ५२ कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे. लवकरच सुरू होणार कामे जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. १५ जून पर्यंत ही कामे पूर्ण करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.आराखडा तयारप्रस्तावित ४५० कामांपैकी ३६९ कामांचे अंदाजपत्रक तयार आहे. केवळ ८१ कामांचे अंदाजपत्रक  बाकी असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे