शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील १०६ जि.प.शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 12:23 IST

 विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळेत होवू शकते समायोजन

ठळक मुद्देकमी पटसंख्येच्या शाळा समायोजित करण्याचा प्रयत्नजिल्ह्यात १०६ शाळांमध्ये कमी पटसंख्याशिक्षकांचेही होऊ शकते समायोजन

आॅनलाइन लोकमतधुळे :  २०  व त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळेत समायोजित करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील १०६ जिल्हा परिषद शाळांमध्ये २० व त्यापेक्षा कमी पटसंख्या आहे. त्यामुळे या शाळांवर भविष्यात गंडांतर येऊ शकते, अशी चर्चा सुरू झालेली आहे. मात्र याबाबत जिल्हा परिषदेला कुठलाही आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही.  जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११०३ शाळा आहेत.  या सर्व शाळा डिजीटल  आहेत.  जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डिजीटलच्या माध्यमातून शिक्षण मिळते आहे. मात्र  आता ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी आता शहरात येतांना दिसतात. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झालेले आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकतर बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळांमध्ये समायोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शासनाचा हा प्रयत्न म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा व त्यांचे भविष्य अंधारात अंधाराच्या गर्तेत ढकलणारा असल्याची टीका होऊ लागली आहे. दरम्यान शासनाच्या या प्रयत्नाच्या विरोधात महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे मंगळवारी राज्यभर काळ्याफिती लावून कामकाज करण्यात आले. साक्री तालुक्यात सर्वाधिक ६८ शाळा २० व त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये साक्री तालुका अव्वल आहे. या तालुक्यात तब्बल ६८ शाळांमध्ये २० व त्यापेक्षा कमी पटसंख्या आहे. त्याखालोखाल शिरपूर तालुक्यात १८, धुळे तालुक्यात १४ व शिंदखेडा तालुक्यातील सहा शाळांमध्ये कमी पटसंख्या आहे. शिक्षक दोन विद्यार्थी मात्र पाच, सातच जिल्हा परिषदेच्या या शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. या शाळांमध्ये दोन शिक्षक असून, विद्यार्थी संख्या मात्र पाच, सात एवढीच आहे. धुळे तालुक्यातील एका शाळेत सात विद्यार्थी आहेत. त्यात पाच मुले व दोन मुलींचा समावेश आहे. साक्री तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत अवघे चार विद्यार्थी आहेत. त्यात दोन मुली, दोन मुलांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे समायोजन२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्यास त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येऊ शकते असेही सांगण्यात आले.   

टॅग्स :Dhuleधुळे