शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहर पोलिसांनी पकडल्या ३४ चोरीच्या दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 13:07 IST

१० लाख ६० हजाराचा मुद्देमाल : चौघांना सुनावली पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहर पोलिसांच्या शोध पथकाने चोरीला गेलेल्या ३४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत़ याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ हस्तगत केलेल्या दुचाकीची किंमत १० लाख ६० हजार इतकी आहे़ यासंदर्भात पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांनी उपस्थित राहुन माहिती दिली़ शहरातील बसस्थानक, न्यायालय, जिल्हा रुग्णालय, तहसील कचेरी, गरुड कॉम्प्लेक्स आदी ठिकाणाहून दुचाकी चोरीला गेलेल्या होत्या़ दुचाकी चोरी करणारे चोरटे ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये येत होते़ परंतु ते सराईत नसल्याने त्यांची ओळख पटत नव्हती़ शहर पोलिसांच्या शोध पथकाने पेट्रोलिंग व गुन्हेगारांवर वॉच ठेवून शोध घेतला असता दिनेश मधुकर वाघ (३०), सतिष आनंदा वाघ (३८) दोन्ही रा़ उभंड ता़ धुळे यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्या चौकशीतून आशिष राजेंद्र शर्मा (३६, रा़ नाशिक) आणि  जितेंद्र दिगंबर मोहीते (३५, रा़ उभंड ता़ धुळे) यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्याकडून ३४ दुचाकी मिळून आल्या़ त्याची किंमत १० लाख ६० हजार इतकी आहे़ ही कारवाई उपअधीक्षक सचिन हिरे आणि पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हिरालाल बैरागी, नाना आखाडे, भिकाजी पाटील, प्रकाश पाटील, सतिष कोठावदे, कबीर शेख, मुक्तार मन्सुरी, प्रल्हाद वाघ, पंकज खैरमोडे, योगेश चव्हाण, संदिप पाटील, रवि गिरासे, राहुल पाटील, कमलेश सुर्यवंशी, तुषार मोरे, अविनाश कराड यांनी केली़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी