शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता जनाग्रह’ अ‍ॅपवर धुळेकर नागरिकांतर्फे तक्रारींचा भडीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:15 IST

१ हजार नागरिकांनी केले अ‍ॅप डाऊनलोड : तक्रार प्राप्त झाल्यानंतर २४ तासात निकाली; आतापर्यंत तीन हजार तक्रारींचा निपटारा

ठळक मुद्देमनपा प्रशासनातर्फे ‘स्वच्छता जनाग्रह अ‍ॅप’ डाऊनलोड करण्याचे आवाहन केल्यानंतर आतापर्यंत शहरातील १ हजार जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.शहरात किमान ८ ते १० हजार नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले पाहिजे, यासाठी मनपाच्या प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दररोज किमान १०० तक्रारी येताहेतया अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज सरासरी १०० तक्रारी प्राप्त होत आहेत. तर शुक्रवारी १६२ तर गुरुवारी तक्रारी १५९ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली असून या तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनपा प्रशासनाने स्वच्छ व सुंदर धुळे शहरासाठी नागरिकांना ‘स्वच्छता जनाग्रह अ‍ॅप’ च्या माध्यमातून तक्रारी कराव्यात, असे आवाहन केले होते. त्याला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  या माध्यमातून आतापर्यंत तीन हजार तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.  दररोज १०० हून अधिक अस्वच्छतेच्या तक्रारी या अ‍ॅपद्वारे प्राप्त होत आहेत. तक्रारी प्राप्त होताच पुढील २४ तासात नागरिकांच्या तक्रारी मार्गी लावल्या जात असल्याची माहिती मनपाचे सहाय्यक  आयुक्त तथा स्व्चछ सर्वेक्षणचे नोडल अधिकारी अनूप दुरे यांनी दिली आहे. तक्रारी मार्गी लावण्यासाठी  २४ तासाचा कालावधी ‘स्वच्छता जनाग्रह अ‍ॅप’ विकसित झाल्यानंतर या माध्यमातून १२ तासात तक्रारी निकाली काढव्यात, असे निर्देश होते. मात्र, मोठ्या शहरातील महानगरपालिकांनी शासनाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या मार्गी लावण्यासाठी १२ तासाचा अवधी हा कमी पडत असून त्यासाठी २४ तास करावा, अशी मागणी केली होती. त्याला शासनाने ‘हिरवा कंदील’ दाखविला. त्यामुळे मनपा कर्मचाºयांना अस्वच्छतेच्या तक्रारी प्राप्त झाल्यापासून त्या २४ तासाच्या आत निकाली काढणे बंधनकारक आहे. १० स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी अ‍ॅपद्वारे शहरातील अस्वच्छतेबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती निकाली काढण्यासाठी १० स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षक सफाई कर्मचाºयांच्या मदतीने शहरात अस्वच्छता राहणार नाही, याची काळजी घेतील, असे आदेश स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले आहे. हे काम प्रामाणिकपणे करणाºया कर्मचाºयांच्या  सेवा पुस्तिकेतही तशी  नोंद घेतली जाणार आहे. चांगले करणाºया कर्मचाºयाचा सत्कारही केला जाईल. तक्रार प्राप्त होऊनदेखील स्वच्छता निरीक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असे मनपातर्फे सांगण्यात आले.  स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना १३ प्रकारच्या तक्रारी करता येणार आहेत. त्यात खुल्या भूखंडावर पडलेला कचरा, गटारी तुंबलेल्या, मेलेली जनावरे, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, शौचालयातील लाईट बंद असणे, घराचा परिसर अस्वच्छ, ओला व सुका कचरा यासंदर्भातील तक्रारींचा समावेश आहे. 

अस्वच्छतेसंदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारी २४ तासात मार्गी लावल्या जात आहेत. शहरातील पेट्रोलपंप चालकांनायापूर्वी पत्राद्वारे  पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृह नागरिकांसाठी मोफत खुले ठेवावे, असे आदेश दिले आहे. हे तपासण्यासाठी शहरात सर्वेक्षण केले जाणार असून स्वच्छतागृह खुले केले नसतील, तर पेट्रोल पंपचालकांवर कारवाई केली जाईल.     -  अनूप दुरे, सहाय्यक आयुक्त, मनपा