शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

कटुआ, उन्नाव येथील घटनांच्या निषेधार्थ धुळ्यात आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 17:55 IST

हजारो स्त्री-पुरूष मोर्चात सहभागी, जिल्हाधिकाºयांना दिले मागण्यांचे निवेदन

ठळक मुद्देभर दुपारी ३ वाजता मोर्चाला सुरवात झाली मोर्चात हजारो स्त्री-पुरूषांचा सहभागविविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले

आॅनलाइन लोकमतधुळे : कठुआ, उन्नाव, दोंडाईचा, कळमसरे येथे बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना संतापजनक आहे. अत्याचार करणाºयांना फाशी देण्यात यावी यासाठी आज धुळ्यात  इन्साफ आक्रोश मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात स्त्री-पुरूष हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकºयांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.जम्मु काश्मिरातील कठुआ, उत्तरप्रदेशातील उन्नाव, दोंडाईचा (धुळे), कळमसरे (अमळनेर) येथे गेल्या काही दिवसात बालिकांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या.  या अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी ३ वाजता तिरंगा चौकातून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चेकºयांच्या हातात विविध घोषवाक्यांचे  फलक होते. तर काहींनी ‘एक होऊ लेकीसाठी’ असे लिहिलेल्या काळ्या टोप्या घातलेल्या होत्या.हा मोर्चा लोकमान्य हॉस्पिटल, बारापत्थर, महात्मा बसेश्वर चौक, तहसील कचेरीमार्गे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचला. पोलिसांनी त्याच ठिकाणी त्यांना अडविले.यानंतर मोर्चेकºयांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात कठुआ येथील बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाºया आरोपीला भर चौकात फाशी द्यावी,  अत्याचार करणाºयांची पाठराखण करणाºयांना सहआरोपी करून त्यांनाही फाशीची शिक्षा द्यावी,  अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालवावे, सोशल मिडीयावरील अश्लिल व्हिडीओंवर तत्काळ बंदी घालावी अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.या मोर्चात सुमारे १५ हजार स्त्री-पुरूष सहभागी झाले होते. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी साडेचार वाजता हा मोर्चा आटोपला. 

टॅग्स :Dhuleधुळेcollectorतहसीलदार