शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

विठू नामाच्या गजरात दुमदुमणार धुळेनगरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 11:34 IST

मालेगाव रोडवर असलेले विठ्ठल मंदिर. या मंदिरात आषाढी एकादशीला सकाळपासून गर्दी होत असते. 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आषाढी एकादशीनिमित्ताने शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी  विठू नामाच्या गजराने अवघी धुळे नगरी दुमदुमणार आहे. आषाढीनिमित्त मंदिरांमधील तयारी अंतिम टप्यात आलेली आहे. शहरातील मालेगाव रोडवरील दसेरा मैदानाजवळ जुन्या काळातील विठ्ठलाचे मंदिर आहे़ त्र्यंबक गणेश गानू यांनी १९६६ साली हे मंदिर बांधले आहे. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडात करण्यात आलेले आहे. मंदिरातील मूर्तीही येथेच घडविण्यात आलेल्या आहेत. मंदिरात विठ्ठलाची साडेतीन फुटाची काळ्या पाषाणाची मूर्ती असून, ही मूर्ती मुंबईचे शिल्पकार शिरवाळकर बंधूंनी घडविली आहे. मंदिरात मूर्तीच्या  बाजुला मारूती व गरूडाची पाषाणातील मूर्ती आहे.   या मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात़ त्यामुळे मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असते़ सकाळी ५ वाजता महापूजाआषाढी एकादशीला सकाळी ५ वाजता गानू परिवारातील सदस्यांच्याहस्ते श्री विठ्ठलाची महापूजा करण्यात येते. त्यानंतर भाविक दर्शन घेत असतात. महिला व पुरूष भाविकांना श्रीविठ्ठलाचे दर्शन घेता यावे म्हणून बॅरिकेटस लावण्यात आलेले आहेत. तसेच या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्त राहील. 

विक्रेत्यांनी थाटली दुकाने; पाळणेही दाखल४मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. गुरूवारी दुपारपासून शहरातील काही भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल होत होते. दरवर्षी येथील मंदिर परिसरात छोटेखानी  यात्रा  भरत असते. ४ ग्रामीण भागातील अनेक भाविक दर्शनासाठी येथील मंदिरात येत  असतात. तर काही भाविक पदयात्रा करत येथे येतात. 

टॅग्स :Dhuleधुळे