शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भक्तनिवास, हॉटेल्स, खानावळीत साचली धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 21:52 IST

भाविकांना हुरहूर । मंदिरे उघडण्याची मागणी

बळसाणे : येथील जैन मंदिर उघडण्यास साधारणपणे सहा महिने झाले़ गावातील शितलनाथ संस्थानाचे व विश्वकल्याणकातील विमलनाथाचे मंदीर बंद आहे़ राज्यासह भारतभरातील कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येणाºया भक्तगणांचा लोंढा कोरोनाच्या महामारीमुळे थांबला आहे़ यामुळे भाविकांना दर्शनाची हुरहूर लागून राहिली आहे़ भाविकांच्या सोयीसाठी असणारे भोजनालय, हाँटेल्स, पुस्तकालय बंद असल्यामुळे सर्व धर्मांचीच मंदिरे खुली करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे़बळसाणे गावातील जैन मंदिर बंद असल्यामुळे शितलनाथ संस्थानचे व विश्वकल्याणक तीर्थाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़ एकुणच बळसाणे वासियांवर आलेले सर्व संकट दुर होण्यासाठी शासनाने मंदिर उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे़तेरावे तीर्थंकर विमलनाथ भगवान, गुरु मंदिर, श्रीराम मंदिर, सप्तशृंगी मातेचे मंदिर, प्रतिपंढरपूर, गणेशाचे मंदिर, कानुबाई मातेचे मंदिर, शिव शंकराचे मंदिर, हनुमानाचे मंदिर, जीनमाता मंदिर, दिमाय मंदिर अशा विविध ठिकाणी दर्शनासाठी दर महिन्याच्या पौर्णिमेला व अमावस्येला, दिवाळी, उन्हाळी सुट्टी अशा विविध दिनी हजारो विमलनाथाचे भक्त दर्शनासाठी येतात़ यातूनच मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते़ ती थांबल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून गरजूंचा रोजगार देखील बंद पडला आहे़ गावातील जैन धर्मशाळा, विश्वकल्याणक, नुतन जैन धर्मशाळा, पौर्णिमा बेन धर्मशाळा बंद आहेत़ पुजा साहित्य, प्रसादालय, हार, रिक्षा, हाँटेल्स आदींचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे़गेल्या ३२ वर्षात ही अशी महाभयानक परिस्थिती कधीच निर्माण झाली नाही़ पैसे उसनवारी घेऊन जैन मंदिर परिसरात व्यवसाय उभा केला़ मात्र कोरोनामुळे सर्व नियोजन धुळीस मिळाले आहे़ गावातील अनेकांचा रोजगार बुडाला आहे़ आर्थिक उलाढाल पुर्णत: ठप्प झाली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे