शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 11:47 IST

‘मोरया’ चा जयघोष : पारंपरिक वाद्यात निघाल्या मिरवणुका

ठळक मुद्देसकाळी सात वाजेपासून शहरात घरगुती गणेश विसर्जन व त्यानंतर छोट्या मंडळांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मानाचा गणपतीची व मोठ्या मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली.रात्री १२ वाजून ४५ मिनीटांपर्यंत मिरवणुका सुरू होत्या. सर्वात शेवटी अमर गणेश मंडळाचा गणपतींची विसर्जन झाले. त्यानंतर विसर्जन मिरवणुका संपल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : पारंपरिक वाद्यांचा होणारा निनाद...गुलालाची चौफेर झालेली उधळण... त्यात भाविकांच्या मुखातून निघालेल्या  ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ.. पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोषामुळे तयार झालेल्या मंगलमय वातावरणात शहरासह जिल्ह्यात लाडक्या बाप्पाचे मंगळवारी विसर्जन झाले. अनंत चतुर्दशीला अर्थातच शुक्रवारी  सकाळी सात वाजेपासूनच घरगुती गणपतींचे विसर्जन पांझरा नदी व बिलाडी रोडवरील ‘हत्ती डोह’ परिसरात सुरू झाले.  वाजत-गाजत भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.  गेली दहा दिवस बाप्पांची सेवा केल्यानंतर अकराव्या दिवशी बाप्पाला निरोप देताना अनेक गणेशभक्त भावूक झाल्याचे चित्र विसर्जनस्थळी दिसून आले. मानाचा खूनी गणपती सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास जुन्या धुळ्यातील खूनी मशिदीसमोर आल्यानंतर यावेळी मुस्लीम बांधवांनी मशिदीतून खूनी गणपतीच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. आठ ठिकाणी व्यवस्था पावसाने यंदा पाठ फिरविल्यामुळे पांझरा नदीचे पात्र कोरडठाक पडले होते. परिणामी, भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून मनपा प्रशासनातर्फे शहरातील आठ ठिकाणी भाविकांना विसर्जन करता यावे, यासाठी व्यवस्था केली होती. अनेक भाविकांनी विसर्जनस्थळी ठेवलेल्या पाण्याच्या टाकींमधील पाण्याचा स्पर्श मूर्तींना करून मूर्ती मनपा प्रशासनाने नियुक्त केलेल्या कर्मचाºयांकडे दिल्या. तसेच निर्माल्यही अस्ताव्यस्थ न फेकता घंटागाड्यांमध्ये टाकले.