शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 13:17 IST

भाविकांचे श्रद्धास्थान; ६ तारखेपासून प्रारंभ, नेर येथे जय्यत तयारी सुरु

नेर : धुळे तालुक्यातील नेर येथे देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सवाला ६ मार्च रोजी फाल्गुन शु ११ आमलकी एकादशीला सुरुवात होत आहे. येथे दोन मंदिरे असून जुने व नवीन अशा दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांची नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी होते. हा यात्रोत्सव पाच दिवस चालतो. या पार्श्वभूमीवर सावता महाराज ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जय्यत तयारी सुरु आहे.परिसरातील ही मोठी यात्रा असते. यासाठी व्यावसायिक दाखल झाले आहेत. यात्रेत आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी मोठे पाळणे, ब्रेक डान्स, टोरा टोरा, मिकी माऊस, चक्री, जंपीग, क्रॉस पाळणा, ट्रायगन, मौत का कुवा, लहान रेल्वेगाडी, साखळी पाळणा, यासह विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल, संसारोपयोगी साहित्याची दुकाने थाटण्यासाठी व्यावसायिकांची लगबग सुरु आहे.पूर्वी यात्रेतच जीवनावश्यक वस्तू मिळायच्या. आता प्रत्येक गावात आठवडेबाजार सुरु झाल्याने व्यावसायिकांना काही प्रमाणात त्याचा फटका बसतो. मात्र, यात्रेत कमी भावात संसारपयोगी वस्तू मिळत असल्याने महिला वर्गाला त्याचे आकर्षण असते. यात्रोत्सवात गुळाच्या जिलेबीलाही मोठी मागणी असते. तसेच मिठाई, रसवंती, आईस्क्रीम, कटलरी, लोखंडी वस्तू,पाण्याचे ड्रम, जीवनावश्यक वस्तू भाजीपाला, लाल मिरची, पाळणे, थंड पाण्यासाठी मातीचे माठ, असे अनेक व्यावसायिक साहित्य दाखल घेऊन झाले आहेत.यात्रेत लोणखेडी, अकलाड, मोराणे, देऊर, उभंड, नांद्रे, भदाणे, भटाई माता परिसर खंडलाय खु, खंडलाय बुद्रुक, बांबुर्ले शिरधाने, गुलाबवाडी आदी गावातील भाविक नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात.ही यात्रा पाच दिवस चालते. पहिल्या दिवशी सायंकाळी चार वाजता परंपरेनुसार सावता महाराज ट्रस्ट व यशवंतराव महाराज नियोजन समितीकडून तगराव मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर नदी किनारी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात येते व यात्रोत्सवास सुरुवात होते. हा परिसरातील मोठा यात्रोत्सव असतो. यासाठी बाहेरगावी नोकरी, कामधंद्यानिमित्त गेलेले नागरिक गावी परतात. नासिक, पुणे, मुंबई, गुजरात राज्यातील सुरत, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यात स्थायिक झालेले भाविक देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सवात दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी खास हजेरी लावतात.यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पांझरा नदी पात्रात कुस्त्यांची दंगल होणार आहे. या कुस्ती स्पर्धेत नेर, कुसुंबा, कापडणे, धुळे, बोरीस, रामी, कावठी, भदाणे येथील मल्ल हजेरी लावतात. ग्रामपंचायतीकडून विजयी मल्लास बक्षिस स्वरुपात स्टीलची भांडी देण्यात येतात.यात्रेत टवाळखोरांवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे यशवंतराव महाराज यात्रोत्सव नियोजन समितीकडून सांगण्यात आले. तसेच कायदा सुव्यवस्था व राखण्यासाठी नेर पोलिसांचाही बंदोबस्त राहणार आहे. यात्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच शंकर खलाणे, ग्रा.पं. सदस्य आदींनी केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे