शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभांची माहिती जिल्हा परिषदेत वेळेवर पोहचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 13:45 IST

सभा झाल्या की नाही याचीच माहिती पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेत वेळेवर प्राप्त होत नसल्याचे समोर आलेले आह़े

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 14 - विशिष्ठ दिवशी ग्रामसभा घेणे, चर्चा करून आढावा सादर करण्याच्या सूचना शासनाकडून वेळोवेळी देण्यात येतात़ मात्र, सभा झाल्या की नाही याचीच माहिती पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेत वेळेवर प्राप्त होत नसल्याचे समोर आलेले आह़े यासाठी वेळोवेळी सूचना देऊनही त्याचा काहीही उपयोग होत नाही़ 1 मे रोजी झालेल्या ग्रामसभांची ग्रामपंचायतनिहाय माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही़  ग्रामीण भागात ग्रामस्थांना शासनाच्या कोणत्या योजना सुरू  आहेत, त्या योजनेचा लाभ आपल्या गावातील किती ग्रामस्थांना घेता येऊ शकतो, गावात कोणत्या सुविधांची आवश्यकता आहे, यासह आनुषंगिक बाबी ग्रामसभेच्या माध्यमातून सांगितल्या जात असतात़ यासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक आह़े ग्रामस्थांना विशेष अधिकारदेखील वापरता येतो़ माहितीचा अभावशासनाच्या धोरणानुसार विशिष्ट दिवशी या ग्रामसभा घेण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आह़े त्यानुसार ग्रामसभा झाल्या का? झाल्या असल्यास त्याची माहिती पंचायत समितीर्पयत पोहचण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची आह़े मात्र 1 मेच्या ग्रामसभेला तब्बल 13 दिवस होऊनदेखील जिल्ह्यातील 551 ग्रामपंचायतींपैकी किती ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्या आहेत, त्याची माहिती अद्यापर्पयत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागार्पयत आलेली नाही़ पंचायत स्तरावर वारंवार मागणी करूनही त्याकडे गट विकास अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे यातून समोर आलेले आह़े त्यामुळे जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा झाल्या याची स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचे पुन्हा एकदा समोर आलेले आह़े दरम्यान, ग्रामपंचायतींनी ग्रामसभांची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत़ अहवाल बंधनकारकग्रामीण भागात ग्रामसभा घेतल्या गेल्यानंतर त्यांचा अहवाल हा पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांच्याकडे लवकरात लवकर सादर केल्यानंतर त्या सभांची माहिती संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक आह़े मात्र असे होत नाही़ आजवर झालेल्या विविध ग्रामसभांच्या माहितीची उदासीनता आजही कायम आह़े शासनाने ठरवून दिलेल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेणे आणि त्याचा अहवाल पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे पाठविणे बंधनकारक आह़े तालुक्यातील चारही गट विकास अधिका:यांनी 1 मे रोजी झालेल्या ग्रामसभेचा अहवाल तातडीने पाठविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत़ लवकरात लवकर अहवाल सादर न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल़ - ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी