शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्य़ात मद्यविक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना घेराव

By admin | Updated: June 15, 2017 13:02 IST

मद्यविक्रीचे दुकान बंद किंवा स्थलांतरीत करण्यात यावे, यासाठी प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांसह परिसरातील नागरिकांनी आंदोलन केल़े

ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 15 - शहरातील प्रमोदनगर सेक्टर 2 मध्ये सुरू असलेले मद्यविक्रीचे दुकान बंद किंवा स्थलांतरीत करण्यात यावे, यासाठी  प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांसह परिसरातील नागरिकांनी आंदोलन केल़े यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांना घेराव घालण्यात आला तसेच भजनही करण्यात आल़ेशहरातील प्रमोदनगर सेक्टर 2 मध्ये एका रहिवासी घरात वाइन शॉप सुरू करण्याच्या हालचाली काही दिवसांपूर्वी झाल्या होत्या़ मात्र, सदरचा प्रकार लक्षात येताच प्रभागाचे नगरसेवक कमलेश देवरे व वैभवी दुसाणे यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने या वाइन शॉपला जोरदार विरोध करीत 9 जूनला आंदोलन केले होते, तसेच जिल्हाधिका:यांना निवेदन दिले होत़े प्रस्तावित वाइन शॉपलगत सुरू असलेले मद्यविक्रीचे दुकान देखील तत्काळ बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली़  दरम्यान, मद्यविक्री दुकानांना विरोध करीत मंगळवारी आंदोलन झाले होत़े त्यानंतर बुधवारी सायंकाळी 7 वाजता पुन्हा एकदा याठिकाणी आंदोलन करण्यात आल़े परिसरातील नागरिक व महिलांनी मद्यविक्री दुकानाच्या ओटय़ावर भजन आंदोलन केल़े तसेच संबंधित मद्याचे दुकानाला विरोध केला़ आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे हे त्याठिकाणी आले असता महिला व परिसरातील नागरिकांनी त्यांना घेराव घातला़ प्रमोद नगरातील दोन्ही मद्यविक्री दुकानांचे परवाने रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली़ यावेळी नगरसेवक कमलेश देवरे यांनी मद्यविक्रीच्या दुकानांना विरोध केला़ ‘जर संबंधित दुकाने तत्काळ बंद किंवा स्थलांतरीत केली नाही तर आम्हा नगरसेवकांना व परिसरातील नागरिकांना देखील मद्यविक्रीचे परवाने द्यावेत, संपूर्ण प्रमोदनगरात दारूगल्ली करू, अशा शब्दात कमलेश देवरे यांनी नाराजी व्यक्त केली़ नगरसेविका वैभवी दुसाने यांनीदेखील अंचुळे यांना जाब विचारत वाइन शॉप टाकण्याचा प्रयत्न झालेले निवासी घर त्यांना दाखविल़े