लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : केंद्र शासनाच्या सततच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात गुरूवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी भोजन काळात क्युमाईन क्लब जवळ निदर्शने केली़अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने मागणी दिनानिमित्त देशभरात निदर्शने केली़ त्यात राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी महासंघ या संघटनांचा सहभाग होता़यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष शेख मन्सरी, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, वाल्मीक चव्हाण, नागेश कंडारे, एस़ यु़ तायडे, उज्वल भामरे, कल्पेश माळी, संजय कोकणी आदी सहभागी झाले होते़जुनी पेन्शन योजना लागू करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड प्रकाशित करणे, केंद्र समान सर्व भत्ते मिळणे, सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करणे, रिक्त पदे भरणे, अनुकंपा भरती विनाअट करणे, उत्कृष्ट कामासाठी पूर्वीप्रमाणे आगाऊ वेतनवाढ मिळणे, महिला कर्मचाºयांना केंद्राप्रमाणे दोन वर्षाची बालसंगोपन रजा मिळणे यासह इतर मागण्या केल्या आहेत़
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 22:15 IST