शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक जनआंदोलनतर्फे धुळ्यात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 17:38 IST

दोंडाईचा, कळमसरे येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या घटनेचा निषेध; आरोपींवर तत्काळ कारवाई करा

ठळक मुद्देदोंडाईचा व कळमसरे येथील घटनांमुळे शालेय विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनातर्फे विशेष उपाययोजना कराव्यात. महिला अत्याचारातील गुन्ह्यांसाठी स्वतंत्र विशेष न्यायालयाची स्थापना करावी. या दोन्ही घटनांचा सत्यशोधक जनआंदोलनच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  जिल्ह्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा) व अमळनेर (जि. जळगाव) तालुक्यातील कमळमसरे येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. या दोन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणा-या आहेत. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणा-या आरोपींवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी  सत्यशोधक जनआंदोलनच्या पदाधिका-यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने केली. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दोंडाईचा व कळमसरे येथील अल्पवयवीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे त्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दोन्ही घटनांचा निषेध आहे. याप्रकरणी दोषी आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कडक शिक्षा देण्यासाठी जलद न्यायालयात खटला चालवावा, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. यावेळी राकेश अहिरे, सिद्धांत बागुल, रोशन खैरनार, योगेश शिरसाठ, सुमेध सूर्यवंशी, चेतन नेरकर, मयूर सोनवणे, सनी शिरसाठ, भावेश हिरे, आकाश भामरे, आदित्य वसावे आदी उपस्थित होते.