शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

धुळ्यात जमावाचे राक्षसी क्रौर्य; मुले पळविणारे समजून पाच जणांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 5:35 AM

किडन्या काढण्यासाठी लहान मुले पळविणारी टोळी गावात आल्याच्या अफवेचे भूत डोक्यात संचारलेल्या ग्रामस्थांनी रविवारी साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील आठवडा बाजारात पाच जणांना जबर मारहाण करून ठार केले.

- आबा सोनवणे/ विशाल गांगुर्डेपिंपळनेर/साक्री (जि. धुळे) : किडन्या काढण्यासाठी लहान मुले पळविणारी टोळी गावात आल्याच्या अफवेचे भूत डोक्यात संचारलेल्या ग्रामस्थांनी रविवारी साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील आठवडा बाजारात पाच जणांना जबर मारहाण करून ठार केले. हे सर्व जण ज्योतिष सांगून उपजीविका करणारे भटक्या समाजातील होते. ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याहून आले होते. मारहाण करत या संशयितांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडण्यात आले. तेथेच जमावाने दगडाने ठेचून, लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण करीत त्यांना ठार मारले.

दादाराव शंकर भोसले (४५), भारत शंकर भोसले (४५), राजू भोसले (४५), भारत माळवे (४७, सर्व रा. खवे ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) आणि आगनू भोसले (२२, रा. मानेवाडी ता. मंगळवेढा) यांना दगड व काठ्यांनी ठेचून क्रूरपणे मारले.क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या घटनेत पोलिसांनी हस्तक्षेप करण्याआधीच पाचही जणांची जबर मारहाणीने ओळखूही येणार नाही, अशी रक्तबंबाळ अवस्था झाली होती. पोलीस येताच जमावाने त्यांच्याकडेही मोर्चा वळविला. मारहाणीत दोन पोलीस जखमी झाले. जमावातील काही जणांनी या घटनाक्रमाचा काढलेला व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात गावकऱ्यांच्या अंगात अक्षरश: राक्षस संचारल्याचे स्पष्ट दिसत होते. त्या व्हिडीओमधून ओळख पटवून संध्याकाळपर्यंत पोलिसांनी २० जणांना अटक केली.घटनेनंतर गावात पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला आहे. गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. बहुसंख्य तरुण व पुरुषमंडळी गावातून पसार झाली आहेत. ग्रुप ग्रामपंचायत राईनपाडा पिंपळनेरपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे....आणि अशी पसरली अफवा !आठवडे बाजारात सकाळी साडेअकराच्या सुमारास आदिवासी महिला भविष्य सांगणाºया एका व्यक्तीला हात दाखवित होती. त्या वेळेस काही तरुण तेथे आले. त्यांनी ज्योतिष सांगणाºया व्यक्तीची विचारपूस केली. घाबरून त्याने उलटसुलट उत्तरे दिली. हे सुरू असतानाच तेथे गर्दी झाली. गर्दीतील काहींनी ‘हे’ लहान मुलांना पळवून नेऊन त्यांच्या किडन्या काढून विकतात, असा आरोप केला. मग वातावरण चिघळले.काही तरुणांनी ‘त्या’ व्यक्तीला मारण्यास सुरुवात केली. त्याला वाचविण्यासाठी काही लोक आले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु हे सर्व आपल्या परिसरातील नसल्याचे पाहून ग्रामस्थ आणखी संतापले. त्यांनी सर्वांना मारहाण केली.ग्रामपंचायत कार्यालयात केले ठार : संशयितांना ग्रामपंचायत कार्यालयात नेल्यानंतर काहींनी पिंपळनेर पोलिसांना फोन केला. तोपर्यंत ग्रामपंचायतीसमोर सुमारे दोन ते तीन हजारांचा जमाव जमला. जमावाने त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली. काही खिडकी तोडून दगड फेकून पाच जणांना जखमी केले. तोपर्यंत काही लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लाठ्या-काठ्यांनी मारत दगडांनी ठेचून पाच जणांची हत्या केली.पिंपळनेर शहराबाहेर राहुट्या टाकून राहणा-या मृतांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात येऊन आक्रोश केला.पित्यालाच बदडलेनंदुरबार : मद्यधुंद व्यक्तीसोबत असलेला चिमुकला रडत असल्याचे पाहून, संशयातून रविवारी नागरिकांनी संजय मोरे (रा़ साक्री) याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले़ चौकशीअंती मद्यपी ‘त्या’ चिमुकल्याचा पिता असल्याचे उघड झाले.

जखमी प्रवाशाला मारहाणजळगाव : धावत्या रेल्वेतून पडल्याने जखमी अवस्थेत मदतीसाठी भादली बुद्रुक (ता. जळगाव) येथे पोहोचलेल्या राजेशसिंग (रा. छत्तीसगढ) याला गावक-यांनी मुलीचे अपहरण करीत असल्याच्या संशयावरून शनिवारी रात्री बेदम मारहाण केली.

अनोळखी इसमाला मारहाणजळगाव : सुभाषवाडी येथे शेळ्या चारणाºया मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन रविवारी तरुणास गावकºयांनी मारहाण करुन मंदिरात डांबले.

टॅग्स :MurderखूनDhuleधुळे