शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाहाने लोकशाही जिवंत राहते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:11 IST

उपायुक्त राजेंद्र जाधव : दिग्नाग फाऊंडेशन सामाजिक संस्थेतर्फे आंतरजातीय विवाहित जोडप्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आंतरजातीय विवाहामुळे समाजातील लोकशाही जिवंत राहते. लोक व्यापक विचार करतात. संकुचित विचार बाजूला पडतात. अंतरजातीय विवाह करण्याºया जोडप्यांनी आपल्या जीवनात आनंदी राहावे. आपल्या जीवनातून समाज समोर नवा आदर्श उभा करावा, असे मत उपायुक्त राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.दिग्नाग फाउंडेशन या संस्थेतर्फे आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार समारंभ व विशेषंकाचे प्रकाशन या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वकील मधुकर भिसे, अ‍ॅड.विशाल साळवे, अ‍ॅड.विनोद बोरसे, प्रा.कमलेश बेडसे उपस्थित होते. समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी सांगितले की,  समाजात परिवर्तन होण्यासाठी व जातींमधील तेढ व वाद मिटवण्यासाठी आणि सशक्त समाज निर्माण होण्यासाठी आंतरजातीय विवाह होणे आवश्यक आहे. ज्येष्ठ वकील मधुकर भिसे म्हणाले की, आंतरजातीय विवाह देशाच्या हितासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. जातीव्यवस्था ही  निसर्गत: नाही. ती मानवनिर्मित आहे. प्राण्यांमध्ये कोणतीही जाती व्यवस्था नाही. केवळ मनुष्य प्राण्यात जातीव्यवस्था दिसून येते. त्यामुळे आंतरजातीय विवाह करणारे जोडपे खºया अर्थाने समाजपरिवर्तनाचे काम करीत आहेत, असे मत प्रा.कमलेश बेडसे यांनी मांडले. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी कार्य केले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आज देखील जातीच्या नावाने आॅनर किलिंगसारख्या घटना घडत आहेत हे भयावह आहे.  असे मतही बेडसे यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक राहुल जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन पगारे यांनी केले. आभार बिपिन मोरे, किशोर वाघ यांनी मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. आंतरजातीय विवाह आणि कायदा असा विषय घेऊन हा अंक काढण्यात आला आहे. या अंकात न्यायाधीश, ज्येष्ठ वकील आणि सामाजिक क्षेत्रातील अभ्यासकांचे लेख आहेत. कार्यक्रमाला तीस जोडप्यांनी उपस्थिती लावली होती.

टॅग्स :Dhuleधुळे