शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोग प्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या फळांना मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:28 IST

धुळे : कोरोना महामारीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांकडून लिंबूवर्गीय फळांची मागणी वाढली आहे. धुळ्याच्या बाजारपेठेत लिंबू, संत्री, मोसंबी, आल्यासह आवळ्याची ...

धुळे : कोरोना महामारीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांकडून लिंबूवर्गीय फळांची मागणी वाढली आहे. धुळ्याच्या बाजारपेठेत लिंबू, संत्री, मोसंबी, आल्यासह आवळ्याची प्रचंड मागणी वाढली आहे. या पाच वस्तूची प्रतिदिन ७० ते १०० टन आवक होत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी स्वत: टरबूज विक्री करण्यास सुरुवात केल्याने स्वस्त दरात मिळणाऱ्या टरबूजला मागणी वाढली आहे. सध्या आंब्यांचा सीझन असल्याने आंबे खरेदीदेखील बाजारात वाढली आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन शासन-प्रशासनातर्फे सातत्याने करण्यात येत आहे. तसेच व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा नियमित आहारात समावेश करावा. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होते, असा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जात आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आयुष मंत्रालय व इतर आरोग्य संस्थांनीही कोरोनापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यावर भर देण्यास सांगितले आहे. व्हिटॅमिन सी असलेली फळे खाण्याचा सल्ला दिला जात असल्याने वर्षभरापासून लिंबूसदृश फळांना मागणी वाढली आहे. त्यामुळे या फळांच्या दरातदेखील वाढ झाली आहे. दरवाढ सामान्यांना परवडणारी नसली तरी आरोग्यासाठी सामान्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. परंतु हातावर पोट असणाऱ्या कामगार, कष्टकऱ्यांना व्हिटॅमिन सी आणि या फळांबद्दल किंवा आहाराबद्दल परिस्थितीमुळे माहिती करून घेण्याचीही गरज वाटत नाही.

कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे शासन आपल्या पातळीवर प्रयत्न करत असताना सामान्य जनता आपापले घरगुती काढे, ज्यूस, औषधोपचारही करताहेत. कोरोना काळात दररोज लिंबू, संत्री, मोसंबी ही फळे खाणे गरजेचे असल्याचे डाॅक्टरांचे मत आहे. तसेच उन्हाळ्यात ही फळे खाल्ल्याने पाण्याचे प्रमाण स्थिर असते.

फळांच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढ

कोरोनाच्या आजारावर उतारा म्हणून या फळांकडे पाहिले जात असले तरी मागणीच्या तुलनेत पुरेशा प्रमाणात त्याची उपलब्धता नसल्याने फळांच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे फळ विक्रेते सांगतात. वीकेंड लाॅकडाऊनमुळे फळांचा बाजारही बंद आहे. लिंबू ३०० ते ३५० रुपये किलो, मोसंबी ९० ते ११० रुपये आणि संत्री ८० ते १०० रुपये किलोचा दर गाठला आहे.