दरम्यान, मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगेमहाराज प्रबोधन परिषदेच्या कार्याध्यक्षा प्रा. वैशाली पाटील यांच्यासह महिला पदाधिकारींनी भिकण वेडू भदाणे, सुभाष दिंगबर भदाणे, पंडित दिंगबर भदाणे या शेतकऱ्यांच्या व्यथा कृषीमंत्री मंत्री दादा यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी शेतकऱ्यांना मदत करावी, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांचा वेळ मागितला होता. त्यानुसार एक महिन्यानंतर मंगळवारी प्रा. पाटील यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. शेतजमीन तलावाच्या पाण्याखाली गेल्याने ती संपादित करून मोबदला द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. परंतु शासनाकडून कोणताही मोबदला मिळणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
निवेदन देताना जिल्हाध्यक्षा शारदा पाटील, कोशाध्यक्षा आशा पाटील, जिल्हा प्रवक्ता यामिनी खैरनार, रोहित पाटील उपस्थित होते.