शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST

धुळे शहर व जिल्ह्यात तूर्तास कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या कमी दिसत असली, तरी एप्रिल महिन्यात वेगळे चित्र होते. सर्वत्र ...

धुळे शहर व जिल्ह्यात तूर्तास कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या कमी दिसत असली, तरी एप्रिल महिन्यात वेगळे चित्र होते. सर्वत्र कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत होती. त्यांच्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन ऑक्सिजन मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. याच कालावधीत जिल्हाधिकारी यादव यांनी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले होते. या आवाहनास धुळे शहरातील ‘संजय सोया ग्रुपचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, संजय अग्रवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सामाजिक दायित्व निधीतून जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जनरेटरसह ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला. या प्रकल्पातून दररोज किमान ६० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाची यंत्रसामग्री काही दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयात दाखल होऊन प्रकल्पाच्या निर्मितीला चालना मिळाली.

बुधवारी विभागीय आयुक्त गमे यांच्या हस्ते जिल्ह्यात सामाजिक दायित्व निधीतून उभ्या राहिलेल्या पहिल्या-वहिल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विनी भामरे, संजय सोया’च्या संचालक संतोष अग्रवाल, अनिल अग्रवाल, रवी अग्रवाल, जिल्हा रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डाॅ.संजय शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त गमे म्हणाले, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपुष्टात आलेला नाही. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनच्या बाबतीत धुळे जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यास जिल्हा प्रशासन आणि संजय सोया ग्रुपने सकारात्मक प्रतिसाद दिला. हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत निश्चितच उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की गेल्या एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली होती. ऑक्सिजनची पूर्तता करताना धावपळ उडाली. मात्र, ऑक्सिजनच्या बाबतीत आपणच स्वयंपूर्ण व्हावे म्हणून विचार पुढे आला. त्यासाठी सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटनांना आवाहन केले होते. त्यास संजय सोया ग्रुपने दिलेला प्रतिसाद अतिशय कौतुकास्पद आहे.

माजी आमदार कदमबांडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नारायण अग्रवाल, वसंत अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, योगेश अग्रवाल, प्रशील अग्रवाल, कमलेश सिन्हा, हेमंत राठोड, प्रणील तनपुरे, विनोद अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल, संजय गिंदोडिया, दिनेश गिंदोडिया, अनुप गिंदोडिया मनोज डिसा उपस्थित होते.