शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:29 IST

उत्साहाचे वातावरण  : ग्राहकांतर्फे स्वदेशी वस्तू खरीदण्याकडे सर्वाधिक कल

धुळे : गणेशोत्सव म्हटला म्हणजे मंडळाच्या अथवा घरगुती ठिकाणी आरास, सजावट आलीच. सजावटीसाठी बाजारपेठेत विविध प्रकाराचे साहित्य दाखल झालेले आहे. सजावटींच्या साहित्याने बाजारपेठ सजू लागली  आहे. यावर्षी सजावट साहित्याच्या दरात किरोकोळ वाढ असून, मागणीही चांगली आहे. विशेष म्हणजे गणेशभक्तांनी चायना वस्तूंना फाटा देत स्वदेशी वस्तू खरेदीलाच प्राधान्य देत आहेत. गणेशोत्सव अगदी तीन  दिवसांवर येऊन ठेपला असून, सर्वत्र तयारी जोरात सुरू झालेली आहे. मंडप उभारणीची कामे वेगात सुरू झालेली आहेत. कारण ही कामे झाल्याशिवाय मंडपाच्या अंतर्गत भागात सजावट करणे अशक्य असल्याने, आता पहिले काम मंडप उभारणीलाच दिले जात आहे.सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच घरगुती गणपती बसविण्यासाठीही आता प्रत्येकाकडे लगबग सुरू झालेली आहे. गणपती बसविण्याची जागेची स्वच्छता करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक असो अथवा घरगुती गणरायाच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे.गणेशोत्सव म्हटला म्हणजे आकर्षक सजावट आलीच.गणेश मूर्तीसमोर सुबक सजावट करण्यावर अनेकांचा भर असतो.इकोफ्रेंडली मखर बाजारातप्लॅस्टिकबरोबरच थर्माकोललाही बंदी आहे. त्यामुळे प्लॅस्टिक व थर्माकोलपासून बनविलेल्या मखराऐवजी इको फ्रेंडली मखर विक्रीस ठेवण्यात आलेले आहे. टिकावू व अत्यंत सुबक, रेखीव नक्षीकाम केलेले मखर, सिंहासन,  मंदिरांना ग्राहकांची पसंती आहे. पुठ्ठे व कार्डशीटपासून तयार केलेले साहित्य अत्यंत वाजवी दरात मिळत आहे. या तयार केलेल्या मखरांमध्ये मोर आसन, डायमंड आसन, पिंपळ आसन, मयूर सेट, आदींचा समावेश आहे. या मखरांना ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याचे विक्रेत्याने सांगितले. त्याचबरोबरच बाजारपेठेत प्लॅस्टिक हारांऐवजी कापडी हार, लेस, मण्यांच्या पडद्याचे अनेक प्रकार बाजारात विक्रीस आलेले आहे.  दरात फारसा फरक पडलेला नसला तरी, यंदा विविध प्रकारचे पडदे, माळा, विक्रीसाठी बाजारपेठेत आलेल्या आहेत. धुळ्याच्या बाजारपेठेत मुंबई, अहमदाबाद, कोलकता या परिसरातून हे साहित्य मोठ्या प्रमाणात येत असते.

टॅग्स :Dhuleधुळे