आता पुन्हा याच ग्रुपमध्ये क्रांतिकारकांच्या आठवणींचा वसा जिवंत ठेवण्यासाठी क्रांती स्मारक उभारण्याची चर्चाही झाली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीत कापडणे गावातील तत्कालीन शेकडो तरुण आपल्या जीवनाच्या समीधा करून संसारावर त्यागपत्र ठेवून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. म्हणून जिल्हाभरात कापडणे गावाची क्रांतिकारक भूमी म्हणून ओळखही आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या संपूर्ण संसाराचे बलिदान देऊन येथील स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठे योगदान दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीची जाणीव होण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या कामगिरीचा वसा तेवत ठेवण्यासाठी कापडणे गावातील ऐतिहासिक दरवाजा चौकात जिल्ह्यात नव्हे असे क्रांती स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी गढीवरील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकच्या प्रांगणात ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. बैठकीस सरपंच सोनीबाई गंगाराम भिल, उपसरपंच प्रतिनिधी अंजनकुमार पाटील, संजय पाटील, रामकृष्ण पाटील, जगन्नाथ पाटील, जिजाबराव माळी, दीपक पाटील, विठोबा माळी, भूषण शिंदे, विशाल शिंदे, भूषण ब्राह्मणे, माजी पंचायत समिती सदस्य शरद माळी, भागवत पाटील, विधायक ग्रुपचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, संतोष एंडाईत, ग्रामपंचायत सदस्य हरीश पाटील, अमोल बोरसे, प्रवीण पाटील, कपिल बोरसे, मनोहर पाटील, योगेश पाटील आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कापडणे गावात क्रांती स्मारक उभारण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST