शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

कर्जापोटी फक्त मुद्दल रकमेची वसुलीचा धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 11:23 IST

अल्पमुदतीच्या कर्जासाठी शून्यटक्के व्याजदर

ठळक मुद्देजिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय मुद्दलाची रक्कम ३१ मार्च २०१८ पर्यंत भरायची आहे.एक लाखावरील कर्ज घेणाºया सभासदांना चार टक्के व्याज सवलत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  २०१७-१८ मध्ये एक लाखाच्या आत अल्प मुदत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी सभासदांकडून व्याजाची वसुली न करता फक्त मुद्दल वसूल करण्याचा व शुन्य टक्के व्याजदराने प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. नियर्णयामुळे शेतकरी सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे.धुळे व नंदुबार जिल्हा बॅँक संचालक मंडळाची बैठक बॅँकेचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली.  त्यात  वरील निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांनी व्याजाची रक्कम न भरता घेतलेल्या मुद्दलाची रक्कम ३१ मार्च २०१८च्या आत भरायची आहे. सभासदाची व्याजाची रक्कम शासनाकडून भरपाई मिळण्यासाठी बॅँक शासनाकडे प्रस्ताव पाठविणार आहे. तसेच एक लाखावरील कर्ज घेणाºया सभासदांना चार टक्के व्याज सवलत मिळणार आहे. दरम्यान केंद्र, राज्य शासन, नाबार्डच्या धोरणानुसार एक लाखपर्यंतच्या पीक कर्जावर शुन्य टक्के व्याजाने प्राथमिक विविध कार्यकारी व आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या सभासदांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. शुन्य टक्के व्याजाची झळ संस्थेच्या व्यवस्थापन खर्चाला बसू नये म्हणून संस्थेच्या दोन टक्के व्याज उत्पन्नाच्या स्वतंत्र निधी तीन कोटीची तरतूद बॅँकेने केली आहे. २०१८-१९ या वर्षासाठी नवीन अल्प मुदत पीक कर्जवाटप एप्रिल २०१८च्या तिसºया आठवड्यात नियमित सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तसेच २०१७पूर्वीची थकबाकी असलेली सर्व कर्ज जुन्या लेखानोंद पद्धतीने व्यवहार करून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. एक लाखावरील पीक कर्जाची दोन टक्के व्याजाची रक्कम संबंधित शेतकºयांकडून शासन निर्णयानुसार वसुल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली आहे.