शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडानजिक बसमधून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 18:35 IST

बोरसे कुटुंबिय स्तब्ध : गावात व्यक्त होतेय हळहळ

ठळक मुद्देशिंदखेडापासून काही अंतरावर घडली ही दुर्घटनाबसचा दरवाजा उघडल्याने तरुणाचा मृत्यूबोरसे कुटुंबिय स्तब्ध, गावात व्यक्त होतेय हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : महामंडळाच्या धावत्या बसमधील दरवाजा अचानक उघडल्याने बारावीचा विद्यार्थी खाली कोसळला़ त्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू ओढवल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेमुळे बोरसे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे़ सध्या दहावी आणि बारावीचे पेपर सुरु आहेत़ बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी विक्की सुदाम बोरसे (१७) (रा़ अमराळे) हा शिंदखेडा येथे परीक्षा देण्यासाठी गेला़ गणित विषयाचा पेपर देवून एमएच २० डी ९४७३ क्रमांकाच्या शिंदखेडा-वाडी या बसमध्ये तो अमराळे गावाकडे जाण्यासाठी निघाला़ शिंदखेडापासून १ किमी अंतरावर स्टेशनरोडवरील हॉटेल सुरभिसमोर धावत्या बसचा दरवाजा अचानक उघडला़ दरवाजाजवळ विक्की हा उभा असल्याने अचानक तो खाली कोसळला़ त्याला डोक्यासह अन्य अवयवांना जबर दुखापत झाली़ परिणामी त्याचा जागीच मृत्यू ओढवला़ बसमध्ये परीक्षार्थीची संख्या आणि इतर प्रवासी मोठ्या प्रमाणात होते़ गर्दी प्रचंड असल्याने तो दरवाजाजवळच उभा होता़ अचानक ही दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे़ विक्की हा घरचा एकलुता होता़ त्याला आई-वडील, दोन बहिणी आहेत़ पैकी एका बहिणीचे दहावीचे पेपर सुरु आहेत़