शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा महामार्गावरील ‘गतिरोधक’ ठरताय जीवघेणे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 18:33 IST

विदारकर स्थिती : पांढरे पट्टे अन् पथदिव्यांचा अभाव, रोड टॅक्स भरुनही दैना कायम!

ठळक मुद्देमुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नालंदा हॉटेलजवळील स्थिती गतिरोधकावर पांढरे पट्टे आणि त्या भागात विद्युत रोषणाईचा अभावअपघात रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न नसल्याचे उघडतातडीने उपाययोजना आखण्याची वाहनधारकांची मागणीजिल्हा प्रशासनाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल नालंदा समोरील गतिरोधकावर कोणत्याही प्रकारचे रंगाचे पट्टे आखलेले नाही की हायमास्ट नाही़ परिणामी वेगात असलेल्या वाहनांमध्ये धडक होते़ वाहनांच्या नुकसानीसोबत महामार्गावरील हे ठिकाण मृत्यूचा सापळा बनला आहे़ याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर येत आहे़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले़ परिणामी या मार्गावरुन येणारे आणि जाणाºया वाहनांचा वेग प्रमाणापेक्षा जास्त आहे़ धुळ्याकडून इंदौरकडे जाणाºया मार्गावर गतिरोधक आहे़ या गतिरोधकाच्या सुरुवातीला मोठा उतार असल्यामुळे वेगात येणाºया वाहनाला अधिक वेग असतो़ रात्रीच्यावेळेस या ठिकाणी हायमास्ट नाही की पथदिवे नाही़ तसेच गतिरोधक दिसण्यासाठी पांढरे पट्टे आखलेले नाही़ एकदम वाहन आल्यानंतर थांबते आणि त्या वाहनाला मागून येणारे वाहन धडकते़ यात जीव गमाविण्याचा कटू प्रसंग ओढवतो़ ही बाब दुर्लक्षित आहे़ 

महामार्गावर त्यातल्या त्यात नालंदा हॉटेलच्या समोरील गतिरोधक रात्रीच्या वेळेस ट्रकचालकांना दिसत नाहीत़ त्यावर पांढरे पट्टे लावायला हवे़ दिशादर्शक फलकही लावण्याची गरज आहे़ - संदिप पाटीलमहामार्गावर उत्तम आणि विशिष्ठ उंचीचे गतिरोधक असायला हवे़ त्यात कोणतेही वाहन अडकणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी़ पुढे गतिरोधक असल्याचे दिशादर्शक फलक लावायला हवेत़ - दशरथ चौधरीगतिरोधकांची झालेली खराब अवस्था आणि अंधारामुळे शक्यतोअर अपघात हे होत असतात़ अपघात होऊ नये यासाठी रस्ता आणि गतिरोधक व्यवस्थित असायला हवे़ पण नेमके त्याचकडे दुर्लक्ष आहे़ या चौकात हायमास्ट लावायला हवा़ - वाल्मिक चौधरीअंधारामुळे रस्त्याच्या पुढे गतिरोधक आहेत हे दर्शविणारे फलक लावायला हवे, पण ते कुठेही दिसत नाहीत़ पुलावर उतार जास्त असल्यामुळे वाहन अगदी वेगाने येत असतात़ त्यात वेग कमी करावा असा संदेश देणार दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे़ - शकील शेख