शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नियम मोडणाºया वाहनचालकांना ‘खाकी’चा हिसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 15:25 IST

धुळे शहर वाहतूक शाखा : वर्षभरात ५२४ वाहनचालकांवर कारवाई, ७४ हजारांचा दंड वसूल 

ठळक मुद्देआता विनागिअरच्या दुचाकींचे प्रमाण सध्या वाढल्याने केवळ अ‍ॅक्सिलेटरवर हात ठेवला तरी दुचाकी चालविता येत असल्याने डाव्या हातात मोबाइल पकडून दुचाकी चालवत बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ या वाहनचालकांचे अर्धे लक्ष मोबाइलवर व्यक्ती काय बोलतेय याकडे असतेविनागिअरची दुचाकी चालविणारे काही वाहनचालक वाहन चालवित असताना सोशल मीडियावरचे संदेश वाचत असतात़ हे संदेश वाचताना त्यांचे वाहनावरील संपूर्ण दुर्लक्ष होते़ त्यामुळे अचानक कोणी वाहनासमोर आल्यास अपघाताची दाट शक्यता असते. धुळे शहर वाहतूक शाखेने फेबु्रवारी २०१७ मध्ये शहरात मोबाइलवर बोलणाºया वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या महिन्यात २७२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. 

देवेंद्र पाठक । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ गेल्या वर्षभरात ५२४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली़ त्यांच्याकडून तब्बल ७४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला़ मोबाइल हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे़ आपल्यापासून तो एक क्षणही दूर असू नये, जर तो दूर झाला तर आपण जगात मागे पडू अशी भावना तरुणाईमध्ये निर्माण होत आहे़ वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असते़ असे असलेतरी वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ गेल्या वर्षभरात वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाºया ५२४ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली़ त्यांच्याकडून तब्बल ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ मोबाइल हा आता केवळ ‘फॅशन’पुरता राहिला नसून ती मूलभूत गरज झालेली आहे़ असे असलेतरी आपल्या जीवापेक्षा ते कधीही महत्त्वाचे नसते़ पण, ही बाब कोणीही लक्षात घेत नाही हे दुर्दैव आहे़ विशेषत: मोटारसायकल चालविताना बोलणारे तर त्यात आघाडीवरच असतात़ अनेक मोटारचालक ‘हॅण्डस् फ्री’ सिस्टिम घेतात़ तर काही जण स्टेअरिंगसमोरच मोबाइल स्टॅण्ड लावून ठेवतात़ कॉल आला की स्पिकर आॅन करून चालत्या गाडीवरच बोलताना दिसतात़ त्यांचे अर्धे लक्ष मोबाइलकडे आणि अर्धे लक्ष समोर असते़ त्यात गाडी वेगात असली तर अपघाताचा धोका आणखीनच वाढतो़ गेल्या वर्षभरात वाहनचालकांवर कारवाई करूनही  वाहनचालकांना शिस्त लागलेली नाही. शहरातील वर्दळीच्या  जागी नागरिक त्यांची वाहने कुठेही उभी करतात. परिणामी, वाहतूक पोलीस कोंडी होते. त्याचा फटका स्थानिक व्यावसायिक व वाहनचालकांना बसतो. त्यासाठी वाहतूक पोलिसांची वर्दळीच्या रस्त्यावर गस्त वाढविणे आवश्यक असून शिस्त लागण्यासाठी पोलिसांनी त्यांचा ‘वचक’ निर्माण करायला हवा, असा सूर व्यक्त होत आहे. 

मोबाइल हातात धरून कोणीही वाहन चालवू नये़ याबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येत असते़ असे कोणी वाहनधारक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते़ दंड करणे हा आमचा उद्देश नसून वाहन चालविताना स्वत:ची आणि दुसºयाची काळजी घेणे हा आहे़ असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश मुंढे यांनी सांगितले़