शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुतोंडी सापाचे आमिष दाखवून एकास गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 17:27 IST

कुसुंब्यातील घटना : बुलढाणा येथील व्यक्तीस मारहाण, एकास अटक

ठळक मुद्देदुतोंडी साप असा कधीही कुठेही दिसत नाही़ दिसल्यास आपला आर्थिक फायदा होतो अशी अंधश्रध्दा आहे़याच अंधश्रध्देचा फायदा उचलत बुलढाण्याच्या एकाला लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला़ धुळे तालुका पोलीस घटनेचा तपास करीत आहेत़ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दुतोंडी साप पाहण्यासाठी बोलाविलेल्या बुलढाणा येथील एकाला कुसुंबा (ता़ धुळे) येथे मारहाण करुन त्याच्याजवळील रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली़ याप्रकरणी  शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करुन तालुका पोलिसांनी एकास अटक केली आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठाविली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथील शेख सिध्दीक शेख सांडू (५२) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, दुतोंडी साप पाहण्यासाठी काही लोकांनी त्यांना  धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे बोलाविले़ मालेगाव येथील नवे बसस्थानकाजवळ राहणारे लियाकत खा हमीद खा यांना सोबत घेवून ते शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे आले. त्यांना कावठी रोडवरील एका घरात बोलाविण्यात आले़ त्याठिकाणी गेल्यावर त्यांना  दमदाटी करुन मारहाण करण्यात आली.  तसेच त्यांच्याकडून २ तोळे सोन्याची चेन, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, मोबाईल आणि १२ हजार ५०० रुपये रोख असा एकूण ५६ हजाराचा मुद्देमाल लुटण्यात आला़ घटनेनंतर संशयित फरार झाले.  मारहाणीत लियाकत खा हमीद खा (रा़ नवे बसस्थानक, मालेगाव) यांना दुखापत झाली आहे़ त्यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी शेख सिध्दीक शेख सांडू (रा़ देऊळगाव जि़ बुलढाणा) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, विनोद चव्हाण (रा़ अजनाळे ता़ धुळे), शाका दंडन चव्हाण (रा़ जामदा), सोनू आणि गुड्डू (पूर्ण नाव माहित नाही) (दोघे रा़ साखरखेडा जि़ बुलढाणा) यांच्यासह ५ जणांविरुध्द भादंवि कलम ३९५, ३९७, ४२० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला़ चार दिवसांची कोठडीयाप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी संशयित विनोद चव्हाण याला ताब्यात घेतले़ त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ बाकी फरार आरोपींचा शोध सुरु आहे़