शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डेंग्यूसह मलेरियाचाही कहर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 14:09 IST

डेंग्यूचे ८२, मलेरियाचे ६७ रूग्ण निष्पन्न : शहरात ६१ रूग्ण डेंग्यूबाधित, उपाययोजना आवश्यक

ठळक मुद्दे१ जानेवारी ते ५ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत जिल्ह्यात डेंग्यूचे ३४० संशयित रूग्ण आढळले आहेत़आतापर्यंत जिल्ह्यात मलेरियाचे ६७ रूग्ण आढळले आहेत़डेंग्यू, मलेरियाचा आढावा आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :  शहरासह जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचा कहर सुरूच असून आतापर्यंत जिल्ह्यात ३४० संशयित रूग्ण आढळले आहेत़ त्यापैकी ८२ रूग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्यात धुळे शहरात ३४० पैकी २६६ रूग्ण आढळले असून ६१ जणांना डेंग्यू झाल्याचे जिल्हा हिवताप विभागाने स्पष्ट केले़ शहरात सर्वाधिक रूग्ण१ जानेवारी ते ५ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत जिल्ह्यात डेंग्यूचे ३४० संशयित रूग्ण आढळले आहेत़ त्यात धुळे शहरात २६६, धुळे तालुक्यात ५०, शिंदखेडा तालुक्यात ८, शिरपूर तालुक्यात ४ व साक्री तालुक्यात १२ संशयित रूग्ण आढळले आहेत़ तर डेंग्यू निष्पन्न झालेल्या रूग्णांमध्ये धुळे शहरात सर्वाधिक ६१, धुळे तालुक्यात ११, शिंदखेडा तालुक्यात ३, शिरपूर तालुक्यात ० आणि साक्री तालुक्यात १ रूग्णाचा समावेश आहे़मलेरियाचे ६७ रूग्णजिल्ह्यात गेल्या महिनाभरात रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे़ आतापर्यंत जिल्ह्यात मलेरियाचे ६७ रूग्ण आढळले आहेत़ त्यात धुळे शहरात ९, धुळे तालुक्यात ५, शिंदखेडा तालुक्यात १६, शिरपूर तालुक्यात १२ व साक्री तालुक्यात २५ रूग्ण आढळले आहेत़ डेंग्यू, मलेरियाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना आहेत़डेंग्यू, मलेरियाचा आढावा आवश्यकशहरात डेंग्यू, मलेरियाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन युध्दपातळीवर उपाययोजना आवश्यक असतांना मनपाचा कारभार सुस्त आहे़ महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयांसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधीही गंभीर आजारांच्या साथीबाबत केवळ बघ्याची भुमिका घेत असून आतापर्यंत एकही आढावा बैठक घेण्यात आलेली नाही़ त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे़उपाययोजनांमध्ये वाढ डॉ. मोरेशहरात उपाययोजनांमध्ये वाढ केली आहे़ मधल्या कालावधीत झालेल्या पावसामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या पोषक आजारांना अनुकूल वातावरण निर्माण झाले होते़ त्यामुळे रूग्णसंख्येत वाढ झाली होती़ त्यामुळे उपाययोजना प्रभावीपणे सुरू असून रूग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांनी सांगितले.