गवत काढले...
धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील उद्यानात पावसामुळे गवत मोठे झाले होते. झाडेझुडपेही वाढली होती. संबंधित कर्मचाऱ्यांनी सदरचे गवत काढले असून उद्यानाची चांगली स्वच्छता केली आहे.
बस सुरू करा
शिंदखेडा : शिंदखेडा शहरापासून रेल्वेस्थानक दोन किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी महामंडळातर्फे पॅसेंजरला संलग्न बससेवा सुरू केली होती. मात्र अनेक वर्षांपासून बंद असून ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आहे.
रस्त्याची दुरवस्था
धुळे : तालुक्यातील दिवाणमाळ ते सडगाव दरम्यानच्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असून, त्यावरून वाहन चालविणे कठीण झालेले आहे. हा रस्ता अगोदरच अरुंद आहे. दुरुस्तीची गरज आहे.
आपत्ती समिती
नेर : गावात येणारी आपत्ती निवारण्यासाठी नेर येथे ग्रामदक्षता समितीची स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आपत्ती निवारणासह ग्रामस्थांच्या मदतीसाठी या समितीचा मोठा दिलासा मिळणार आहे.