शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेड्यात वृद्ध  कलावंतांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:19 IST

विविध मागण्या : गटविकास अधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करावी, प्रतिवर्षी कलावंतांचे तीनशे प्रस्ताव मंजूर करावे, यासह विविध मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे मंगळवारी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शिवदे यांना खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनात शाहिरांनी आपली शाहिरी कला दाखवत अनोखे आंदोलन केले. यात महिला शाहीर कलावंतांचा देखील सहभाग होता. राज्य शासनातर्फे वृद्ध कलावंतांना मानधन दिले जाते. मात्र हे मानधनही वेळेत मिळत नाही. कलावंतांच्या बँक खात्यावर आॅनलाइन मानधन जमा होईल, असे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही होताना दिसत नाही. शासन प्रतिवर्षी केवळ ६० कलावंतांची मानधनासाठी निवड करते ती मर्यादा ३०० पर्यंत करावी, अशा मागण्यात करण्यात आल्या. तालुक्यात शाहीरी कलावंत आहेत. मात्र या कलावंतांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता पं.स. कार्यालयासमोर जवळपास तीन तास धरणे आंदोलन केले. यावेळी गटविकास अधिकारी शिवदे यांना वारकरी मंडळातर्फे मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनात प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप, प्रदेश महासचिव नानाभाऊ वाघ, जिल्हाध्यक्ष पांडुरंग माळी, जिल्हा उपाध्यक्ष नागराज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष जयसिंग गिरासे, जिल्हा संघटक शिवदास माळी, तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी, शाहीर व भजनी मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे