शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तीन गावांमध्येच झाली नुकसानाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:32 IST

पालकमंत्र्यांचा धावता दौरा । पंचनाम्यांचा अहवाल चार दिवसांत सादर करण्याचे दिले निर्देश

धुळे : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभाग, महसूल विभाग व ग्रामविकास विभागाने संयुक्तपणे पंचनामे करून नुकसानाचा अहवाल चार दिवसांत सादर करा, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी येथे दिले.जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुसे यांनी शनिवारी सकाळी धुळे तालुक्यातील आर्वी, देवभाने, सरवड आदी गावांना भेट देवून नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी.एम. मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर) यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाहीमहसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवून शेतीतील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पीक विमा कंपनी, कृषी विभागाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. नुकसानीचा अहवाल आल्यानंतर तो राज्य शासनाला सादर करण्यात येईल. त्यानंतर नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याची सूचना पालकमंत्री भुसे यांनी केली. तसेच भिज पावसामुळे झालेल्या पडझड झालेल्या घरांचा पंचनामा करुन त्याचाही अहवाल सादर करावा. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवावा.गुरांच्या लसीकरणाकडे लक्ष द्यायाशिवाय पावसामुळे चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत चाºयाचे नियोजन करावे. सततच्या पावसामुळे साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी फवारणी, धुरळणी करावी. जनावरांसाठी लसीकरण मोहीम राबवावी. तसेच शेतकºयांसाठी आलेले अनुदान तत्काळ त्यांच्या बचत खात्यात जमा करण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी बँक अधिकाºयांची आढावा बैठक घ्यावी, असेही निर्देशही मंत्री भुसे यांनी दिले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करताना एकही लाभार्थी शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घेण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समन्वय ठेवावा.नुकसानीची केली पाहणीतत्पूर्वी भुसे यांनी आर्वी, देवभाने, सरवड परिसराला भेट देत शेतीतील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे, उपविभागीय अधिकारीदराडे, तहसीलदार किशोर कदम, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे आदी उपस्थित होते.अपघातग्रस्ताला मदतपालकमंत्री भुसे आर्वीकडून देवभाने गावाकडे जात असताना त्यांना नगावबारीजवळ अपघातग्रस्त व्यक्ती दिसला. त्यांनी वाहन थांबवून अपघातग्रस्त व्यक्तीसोबत असलेल्या नातेवाईकांकडे चौकशी केली. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या वाहनातून तातडीने अपघातग्रस्त व्यक्तीस जिल्हा रुग्णालयात पाठविले. जिल्हा शल्यचिकित्सकांशी मोबाईलवरुन संपर्क साधून अपघातग्रस्त व्यक्तीवर तातडीने उपचार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

टॅग्स :Dhuleधुळे