शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

धरण उशाला, कोरड घशाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:11 IST

ग्रामस्थांची वणवण : म्हसाळे येथे भीषण पाणीटंचाई, पाण्याअभावी नळ पाणी योजना बंद

निजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्याच्या पुर्वेला असलेल्या म्हसाळे गावात वाढत्या तापमानाबरोबर भिषण दुष्काळी स्थितीचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई उग्र रूप घेत आहे. दोर, बादली घेऊन गाव विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिला, मुलांची झुंबड उडत आहे. गावाची नळ पाणी योजना याअगोदरच पाण्याअभावी पूर्णपणे बंद पडली आहे. गावालगत धरण असूनही उपयोगास परवानगी नाही. त्यामुळे धरण उशाला, कोरड घशाला, अशी ग्रामस्थांची स्थिती झाली आहे.निजामपूर-लामकानी रस्त्यावर दीड हजार वस्तीचे म्हसाळे गाव आहे. हा पर्जन्यछायेचा भाग गणला जातो. पावसाळ्यात या परिसरात अत्यल्प पाऊस झाला. परिसरातील पाझर तलाव, नदी, नाले पार कोरडे आहेत. त्यामुळे गुरांना पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, अशी समस्या निर्माण झाली आहे. म्हसाळे धरणावर गुरांना पाणी पिण्यासाठी न्यावे लागत आहे.गावासाठी असलेली नळ पाणी पुरवठा योजना दक्षिणेकडील बापूजी धरणाखालील विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. पण त्या विहिरीचे पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे.गावासाठी एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र, ते पाणी नळाद्वारे देणे शक्य नसल्याने ते पाणी आणून गाव विहिरीत टाकण्यात येते. त्यातून दोर बादलीद्वारे महिला, पुरुष पाणी भरून नेतात. इतकाच काय तो गावास आधार आहे. पाणी मिळविण्यासाठी येथे मोठी गर्दी होते.गावाच्या दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावर गारबर्डी धरण आहे. त्याची उंची व लांबी वाढविली तर पावसाळ्यात पाणीसाठा वाढेल. जलसिंचन वाढेल, शिवाय पिण्याचा पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल. यासाठी सतत चार वर्षांपासून पाठपुरावा करीत असल्याचे गुलाबराव का. माळी यांनी सांगितले. परंतू उपयोग झालेला नाही.तीव्र उन्हामुळे भूगर्भातील पाणी संपते आहे. गावालगत असलेल्या धरणाला म्हसाळे धरण नाव दिले आहे. मात्र, या धरणाचा म्हसाळेच्या लोकांसाठी पाणी मिळण्यात यत्किंचितही उपयोग होत नाही. या धरणाखाली विहीर खोदण्यास परवानगी मिळावी म्हणून ३ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ गेले होते. पण त्यांना निराश होऊन परतावे लागले. परवानगी मिळू शकली नाही. सरपंच भागाबाई दिलीप सोनवणे, उपसरपंच रुपाली गुलाब माळी व सदस्यांनी नागरिकांच्या पिण्याच्या पाणीप्रश्नी लवचिक, सकारात्मक धोरण घेण्याची आवश्यकता अपेक्षित केली आहे.यापूर्वी सन २०१४, २०१७ मध्ये गावास टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता तशी वेळ येऊ नये म्हणून गारबर्डी धरणाची उंची व लांबी वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात पाणीप्रश्न दूर होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे