तिसगाव : ढंडाणे येथे सुरू असलेल्या किर्तन सप्ताहाची सांगता ह.भ.प. धनश्री महाराज यांच्या किर्तनाने झाली. त्या वेळेस त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म आणि त्यांच्या रासलीला आणि त्यांनी केलेले कर्तृत्व सांगत सप्ताह निमित्ताने दहीहंडी याचे मुख्य महत्त्व पटवून दिले.त्यांनी आपल्या किर्तनातून पंचक्रोशीतील तिसगाव, ढंढाणे, वडेल, नगाव, धमाणे, कापडणे, देवभाने, सायने, निकुंबे, गोंदूर, निमडाळे, नगावबारी व समस्त वारकरी व उपस्थितांना मंत्रमुग्ध करत सप्ताहाची सांगता झाली.कीर्तनाच्या शेवटच्या भागात ह.भ.प. धनश्री महाराज यांच्या नेतृत्वाखाली केलेली दही आणि लाहीची महादेव मंदिराच्या प्रांगणात बांधण्यात आलेल्या हंडीची बोली लावण्यात आली. त्यात बसलेल्या भाविकांनी आपापल्या परीने म्हणजे पाच हजार रुपयेने सुरुवात झाली आणि वसंत भास्कर भामरे यांनी २१ हजार १०१ रुपयांची बोली लावून उपस्थितांसमोर फोडण्यात आली. त्या दही व लाही या प्रसादाने उपवास सोडण्यात आला.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन ढंढाणे येथील सर्व ग्रामस्थांनी नियोजन करून आलेल्या पंचक्रोशीतील व सर्व गावासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे नियोजन ढंढाणे येथील परशुराम पाटील, दिलीप अहिरे, साहेबराव संपत, वसंत पाटील, अशोक भामरे, मोतीलाल मिस्त्री, नाना पाटील, गोकुळ पवार, दिनेश देसले, आबा आमखेलकर, चेतन पाटील, प्रकाश शिसोदे, दादाभाऊ फकिरा, संभाजी रामदास यांच्यासह ग्रामस्थांनी केले. आभार ह.भ.प. साहेबराव मोरणेकर यांनी आभार मानले.
ढंढाणेला दहिहंडीने सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:12 IST