शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निजामपूर येथे लुटमार करणारा वसंत पवार पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 12:56 IST

निजामपूर : अवघ्या अर्धा तासातील कामगिरी, अनेक गुन्हे उघड होणार

ठळक मुद्देनिजामपूर पोलिसांची कामगिरीलुटमार करणारा संशयित वसंत पवार ताब्यातपाच संशयितांच्या नावांची यादी आली समोर

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : कोल्हापूरच्या व्यापाºयाला लुटणारा, २०१६ पासून पोलिसांच्या हिट लिस्टवर असणारा, सुझलॉनची तार चोरणारा संशयित वसंत पवार याला निजामपूर पोलिसांनी पाठलाग करुन अवघ्या अर्धातासात शनिवारी सकाळी पकडले़ त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून ५ संशयितांची नावे समोर येत आली आहे़ निजामपूर पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत़ मालेगाव येथील गौरव संजय येवले या भंगार खरेदी विक्री व्यावसायिकास साक्री तालुक्यातील जामदे येथील वसंत पवार याने फोन करून सुझलॉन कंपनीची तांब्याची तार आहे, तिची विक्री करावयाची असल्याचे सांगितले. त्यानुसार शुक्रवारी दुपारी २ वाजता गौरव येवले व त्याचा मित्र अशोक नारायण उबाळे हे मालेगाव येथून दुचाकीने टिटाणे फाट्यावर पोहोचले. तेथे विना क्रमांकाची दुचाकी घेऊन उभा असलेल्या जॉन भोसले याने वसंत पवार साहेबांनी बोलवले असून सुझलॉन कंपनी जवळ नेले. नंतर पवार व जॉन भोसले यांनी त्यांना पुर्वेकडे एक किमी अंतरावर नेले. तेथे २ दुचाकीवर ४ जण आले. त्या सर्वांनी मारहाण सुरू केली. यात २०हजार ५०० रुपये रोख, मोबाइल, सोन्याची अंगठी, चैन, कानातील सोन्याच्या बाळ्या, पॅन कार्ड, वाहन परवाना असा ५५ हजाराचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला. या दरम्यान मालेगावच्या त्या दोघांनी पळ काढला. रस्त्यात निजामपूर पोलिसांचे वाहन दिसले. वाहनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना घटना सांगितली. वाहनात पोलीस कर्मचारी कोकणी, शिरसाठ, अहिरे आणि कुंभार होते. त्यांनी तातडीने पाठलाग सुरू केला. दोन जण दुचाकीवरुन जात होते. त्यांचा पाठलाग केला. पेटले गावातील लोकांच्या मदतीने सुझलॉन कंपनीचा मॅनेजर म्हणून आलेला वसंत पवार यास तात्काळ शिताफिने पकडले. त्याचवेळेस त्याच्या सोबत असलेला एक जण मात्र तेथून पळून गेला.पोलिसांनी पकडलेल्या वसंत पवारची चौकशी केली असता त्याच्याकडून पाच जणांची नावे समोर आली आहेत़ संशयितांमध्ये जॉन संतोष भोसले, प्रदीप मॅनेजर चव्हाण, जानी संतोष भोसले, बालम अशोक भोसले, अजय चतुर पवार (सर्व राहणार जामदे) यांचा समावेश आहे़ या वसंत पवारसह ६ जणांविरुध्द भादंवि कलम ३९५, ३२३, ५०६ प्रमाणे निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित वसंत पवार याच्या चौकशीतून ३ वेगवेगळे गुन्ह्याची उकल होत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली़ त्याच्यासह अन्य जणांच्या चौकशीतून अनेक गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेNijampurनिजामपूर