शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात लवकरच सीटीस्कॅन, एमआरआयची सुविधा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 15:03 IST

मुख्यमंत्री : आरोग्य शिबिरप्रसंगी केली घोषणा 

ठळक मुद्देअटल महाआरोग्य शिबिरस्थळी सकाळपासून रूग्णांच्या मोठ्या रांगा मुख्यमंत्र्यांचे सव्वाअकरा वाजता आगमन गिरीष महाजन, जयकुमार रावल या मंत्रीद्वयांची उपस्थिती 

आॅनलाइन लोकमतधुळे : शहरातील जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये सीटी स्कॅन, एमआरआयची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध केला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित अटल महाआरोग्य शिबिरप्रसंगी केली. धुळे आतापर्यंत मागे राहिले, परंतु आता यापुढे तसे होणार नाही, असे सूतोवाचही त्यांनी केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ आयोजित या महाआरोग्य शिबिरास सकाळपासूनच प्रारंभ झाला होता. मुख्यमंत्र्यांचे शिबिरस्थळी ११.१५ वाजता आगमन झाले. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री व या शिबिराचे आयोजक गिरीष महाजन, रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे, आमदार स्मिता वाघ, जळगावचे आमदार राजू भोळे, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते.धुळ्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी काही संकल्पनांवर काम केले जाणार आहे. त्या अंतर्गत सुलवाडे-जामफळ योजनेसाठी हजारो कोटीच्या निधीस मान्यता दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.दुष्काळासह विविध प्रश्नांचा उहापोह करणाºया जयकुमार रावल यांच्या भाषणाचा धागा पकडून त्यांनी धुळ्याचे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. आरोग्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आयुष्मान भारत ही आरोग्य योजना आणत असून त्यानुसार ५० कोटी लोकांना प्रत्येकी ५ लाखापर्यंत वैद्यकीय विमा काढण्यात येणार आहे. त्यात समाविष्ट आजारांचा समावेश राज्याच्या म.फुले आरोग्य जीवनदायी योजनेत केला जाईल, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नसून अद्याप पाऊस बाकी आहे. मात्र दुष्काळ राहिल्यास शासनाची मदतीची भूमिका राहील, असेही ते म्हणाले.या प्रसंगी मंत्रीद्वय जयकुमार रावल व गिरीष महाजन यांनीही भाषणे केली. रावल यांनी शहर व जिल्ह्याचे प्रश्न मांडले. तर महाजन यांनी वैद्यकीय उपचारांसाठी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी हा कार्यक्रम पक्षीय नव्हे तर सर्वपक्षीय असल्याचे नमूद करून सर्वांसाठी खुला असल्याचे सांगितले.प्रास्ताविक डॉ.तात्या लहाने यांनी केले. शिबिरस्थळी रूग्णांच्या रांगा दरम्यान सकाळपासून येथील आरोग्य शिबिरात जिल्हा तसेच अन्य जिल्ह्यातूनही रूग्ण व त्यांचे नातेवाईक दाखल झाले होते. विविध आजारांवरील तपासणी कक्षाबाहेर त्यांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या पहावयास मिळाल्या. तपासणी करून ज्या रूग्णांवर शस्त्रक्रिया गरजेची असेल त्यांना स्टीकर (लोेगो) देण्यात येत आहेत. पुढील चार महिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार  असल्याचे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :Dhuleधुळे