शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

आमदार कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष काशिराम पावरा यांच्या स्वागतासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:37 IST

फटाक्याच्या आतिषबाजीत जल्लोषात साजरा

शिरपूर : मतमोजणीनंतर महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या विजयाचा जल्लोष येथील आमदार कार्यालयातील प्रांगणात गुलाल उधळत फटाक्याच्या आतिषबाजीत जल्लोषात साजरा करण्यात आला़रिमझिम पावसात डीजेच्या वाद्यावर अनेकांची पाऊले थरकलीत़ जस-जसे मताधिक्य वाढत गेले तसे रिमझिम पावसात देखील आनंदोत्सव साजरा झाला़ मतमोजणीनंतर अनेकांनी पटेल बंधूची भेट घेतली़ आमदार काशिराम पावरा यांचे गुलाल उधळून, पुष्पमालाच्या व फटक्याचे आतिषबाजीत कधी नव्हे असे अपूर्व स्वागत जनसमुदायाने केले़ यावेळी केवळ आदिवासीच नाही तर मतदार संघातील मोठ्या संख्येने नागरीक निकाल ऐकण्यासाठी जमले होते़ यावेळी माजी आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, भूपेशभाई पटेल, तपनभाई पटेल, चिंतनभाई पटेल यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली़ यावेळी डॉ़ तुषार रंधे, बबन चौधरी, राहुल रंधे, हेमंत पाटील, हिंमत महाजन, राजु टेलर, भरतसिंग राजपूत, मनोज धनगर, देवेंद्र पाटील, प्रभाकर चव्हाण, राजगोपाल भंडारी, प्रसन्न जैन, नरेंद्रसिंग सिसोदिया, सुभाष कुलकर्णी, शैलेंद्र अग्रवाल, कैलासचंद्र अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, गोपाल भंडारी, यशवंत बाविस्कर, राधेश्याम शर्मा तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावेळी सायंकाळी उशिरापर्यंत जोश कायम होता़शिरपूर तालुक्याचे ८ वे आमदार ़़़स्वातंत्र्यानंतर पहिली विधानसभा निवडणूक सन १९५२ साली होवून हा मतदार संघ खुला गटाकरीता आरक्षित होता़ त्यावेळी पहिले आमदार होण्याचा बहुमान काँग्रेसचे ग़द़माळी यांना मिळाला होता़ त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून कर्मवीर व्यंकटराव रणधीर, काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव पाटील, जनता पक्षाकडून प्रल्हादराव पाटील, काँग्रेसकडून इंद्रसिंग राजपूत, जनता पक्षाकडून संभाजीराव पाटील, काँग्रेस पक्षाकडून अमरिशभाई पटेल, काँग्रेसकडून काशिराम पावरा तर आता भाजपाकडून काशिराम पावरा हे निवडून आले आहेत़ स्वातंत्र्यानंतर या ६७ वर्षात ८ वे आमदार म्हणून काशिराम पावरा आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे