जिल्ह्यासह महानगरात बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. सोमवारी महानगरात पुन्हा ?????? नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत ल्हात ००० रूग्ण कोरोना बाधित झाले आहेत. दरम्यान देशातील पहिला कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जानेवारी महिन्यापासून शुभारंभ झाला आहे. यात पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचारी दुसऱ्या टप्यात मनपासह आरोग्य तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने तिसऱ्या टप्यात ६० वर्षा पुढील जेष्ठ नागरिकांना सरकारी रूग्णालयातून मोफत तर खाजगी रूग्णालयात २५० रूपयात लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान मनपा आरोग्य विभागाने सर्वासाठी लस उपलब्ध होण्यासाठी महापालिकेच्या जुन्या इमारतील लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे. मात्र नागरिकांना लसीकरणासाठी प्रतिसाद वाढत असल्याने मनपा आरोग्य विभागाची चांगलीच तारांबळ उडत आहे.
नियोजनाचा अभाव
जुन्या मनपात इमारतील पुरेशी जागा असताना या ठिकाणी नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पालन होतांना दिसून येत नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी सोमवारी सकाळपासून नागरिकांची मोठी रांग लागली होती. वास्तविक, नागरिकांनी गर्दी होऊ नये किंवा कोरोनाचा संसर्स टाळण्यासाठी मनपा आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्याची गरज होती. मात्र, अपूर्ण नियोजनाअभावी, यासाठी नागरिकांना गर्दी करून रांगेत उभे राहण्याची वेळ आली होती.