शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात युद्धसाहित्याचे प्रदर्शन  बघण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 13:28 IST

एसआरपीएफच्या मैदानावर सुरू आहे प्रदर्शन, दुपारच्या सत्रात चित्तथरारक प्रत्याक्षिके

ठळक मुद्देयुद्ध साहित्य प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांची सकाळपासूनच गर्दीभर उन्हात उभे राहून अनेकांनी युद्ध साहित्य न्याहाळलेसैन्य दलाच्या साहित्याबद्दल अनेकांनी घेतली माहिती.

आॅनलाईन लोकमतधुळे : येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर भरविण्यात आलेले  रणगाडे व युद्धसाहित्याचे प्रदर्शन  बघण्यासाठी रविवारी शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. ‘आगे बढो’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे़ शनिवारी हे प्रदर्शन मांडण्यात आले. मात्र त्याच दिवशी अनेकांनी हे प्रदर्शन पाहण्याचा मनमुराद आनंद घेतला.रविवारी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले होते. सकाळी साडेआठ वाजेपासूनच नागरिकांची पाऊले एसआरपीएफच्या मैदानाकडे वळू लागली होती. बघता बघता या मैदानावर हजारो नागरिकांची गर्दी झाली होती. विशेषत: अनेकजण परिवारासह आले होते. पालक आपल्या पाल्यांना प्रत्येक युद्ध साहित्य दाखवित होते. हे युद्ध साहित्य, रणगाडे, तोफा बघतांनाही लहान मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या चेहºयावर अतिशय कुतुहुलता दिसून येत होती. या प्रदर्शनात  सर्वांचे आकर्षण ठरते आहे ती बोफोर्स तोफ. १९८९ मध्ये १५५ मि.मी. बोफोर्स तोफ   भारतीय सैन्यात दाखल झालेली आहे. तीचे वजन ११ हजार ५००   किलोएवढे  आहे. ही तोफ ३१ किलोमीटर अंतरापर्यंत गोळाफेक करू शकते. तोफेत असलेल्या एका गोळ्याचे वजन तब्बल ३४ किलो एवढे आहे. १४ सेकंदामध्ये तीनवेळा या तोफेतून फायर होत असते. यात सैन्य दलाचे ९ जवान असतात.या तोफेचा वापर कारगीलच्या युद्धातही करण्यात आलेला होता. अनेकांनी अतिशय कुतुहलतेने ही तोफ बघीतली.  या तोफेविषयीची माहिती  भारतीय सैन्याचे जवान मराठीतून  देत होते.याशिवाय बीएमपी-२ अर्थात बोलविया मशीनो पिकोते रणगाडा, टी-९० हा रशियन बनावटीचा  रनगाडा,फ्लाईकैचर रडार,  भारताने तयार केलेली १०५ मि.मी.भारतीय फिल्ड तोफ, रशियन बनावटीची १३० मी.मि. तोफ एम-४६ ,बॉम्ब निकामी करणारे रिमोट चलित छोटे वाहन, मल्टी युज रेबोट व्हेईकल,  दारूगोळा शोधण्याचे यंत्र, कारबाईन मशीन गन ९ एम.एम, ९ मिलीमीटरचे पिस्तोल, ५.५६ मि.मी.ची इन्सास रायफल, आदी साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आलेले आहे. हे प्रत्येक युद्धसाहित्य बघतांना प्रत्येकाच्या चेहºयावर उत्सुकता, कुतुहुलता दिसून येत होती. सैन्याचे अधिकारीही प्रत्येक युद्ध साहित्याबद्दल नागरिकांना माहिती देत होते. 

टॅग्स :Dhuleधुळे