शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात वीज कंपनीसह महापालिकेविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 22:41 IST

मुलाचे मृत्यू प्रकरण : तक्रार करुनही दुर्लक्ष केल्याने घडली दुर्घटना

धुळे : साक्री रोडवरील कुमारनगरात चार वर्षाच्या मुलाला विद्युत पोलच्या शॉकमुळे मृत्यू झाला होता़ त्या पोलला शॉक लागत असल्याची तक्रार करुनही दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे़ यामुळे वीज वितरण कंपनीसह महापालिकेच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़साक्री रोडवरील कुमार नगरात राहणारे निशांत महेंद्रकुमार रेलन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, पुतण्या लव्यम प्रशांत रेलन (४) हा १० डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरासमोर असलेला बी-पी/०२ क्रमांकाच्या विद्युत पोलजवळ खेळत असताना त्याला इलेक्ट्रिक पोलचा विजेचा शॉक लागला़ त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले़ याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़सदरहू क्रमांकाच्या पोलमधून विद्युत प्रवाह येऊन शॉक लागत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे घरासमोर राहणारे कमलाकर सेनापती इंदवे यांनी त्यांच्या मोबाईलवरुन महावितरण कंपनीला नोव्हेंबर २०१९ मध्ये आॅनलाईन तक्रार केली होती़ तरी देखील महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पोलमधील दोष दुरुस्त केला नाही़ परिणामी लव्यम याला शॉक लागून मृत्यू झाला़ यासंदर्भात संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होण्याबाबत महावितरण कंपनीला तक्रारी अर्ज दाखल केले़त्याअनुषंगाने विद्युत निरीक्षक एच़ एऩ गांगुर्डे यांनी केलेल्या चौकशीत घटनास्थळी वीज कंपनीचा विद्युत पोल असून त्यावर ११ केव्ही उच्चदाब व लघुदाब तार मार्गाची एकत्रितपणे उभारणी केली होती़ या लोखंडी पोलच्या क्लॅम्पला महापालिकेची विद्युत मीटर पेटी मधून निघालेली १० स्वेक्अर एमएम सर्व्हिस वायर इन्सुलेटरचा वापर न करता दुसºया वायरच्या सहाय्याने बांधलेली होती़ या सर्व्हिस वायरचे आणि तिला बांधलेल्या दुसºया वायरचे आवरण वितरल्याने आतील विद्युत भारीत तारांचा एकमेकांशी स्पर्श होत असल्याने लोखंडी पोल विद्युत भारीत होत होता़ त्यावरील विद्युत संच मांडणीवर योग्य निगा, देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे सदरची घटना घडली असल्याचा आरोप करीत वीज वितरण कंपनी आणि धुळे महापालिका हे दोघेही संयुक्तरित्या जबाबदार असल्याबाबतचे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे़ परिणामी जबाबदारी आणि कर्तव्य असताना देखील त्यांनी त्यांच्या कर्तव्यात निष्काळजी व हलगर्जीपणा केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याने शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे