शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभाग, तहसीलदार यांच्यावर गुन्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 00:09 IST

मनपा: नदीपात्रात बेकायदा वृक्षतोडीची तक्रार, वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत आज निर्णय

धुळे : शहरातील पांझरा नदीपात्रात सव्रेक्षणाच्या नावाखाली बेकायदेशिर वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार मनपा वृक्ष प्राधिकरण समितीला प्राप्त झाली आह़े त्यानुसार प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत वृक्ष प्राधिकरण समितीच्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणा:या सभेत निर्णय घेतला जाणार आह़े शहरातील पांझरा नदीपात्रात सव्रेक्षणाच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग व शहर तहसीलदार यांनी मोठय़ा प्रमाणात बेकायदेशिर वृक्षतोड केल्याची तक्रार सचिन सोनवणे यांनी मनपा वृक्ष प्राधिकरण समितीकडे केली होती़ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व शहर तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करून नदीपात्रात प्रस्तावित रस्त्याचे काम थांबविण्याची मागणीही करण्यात आली होती़ त्यानुसार मनपा वृक्ष प्राधिकरण समितीच्या त्रिसदस्यीय समितीने प्रत्यक्ष पाहणी केली असता हत्तीडोह परिसरात आठ ते दहा झाडांची तोड झाल्याचे दिसून आल़े त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला वृक्ष समितीने नोटीस बजावित वृक्षतोडीबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याचे सूचित केले होत़े मात्र बांधकाम विभागाकडून कोणताही खुलासा करण्यात आला नाही़ त्यामुळे अखेर सोनवणे यांचा तक्रार अर्ज आयुक्तांच्या आदेशाने वृक्ष प्राधिकरण समितीसमोर सादर केला जाणार आह़े सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व शहर तहसीलदार यांच्यावर बेकायदा वृक्षतोडीबाबत गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आह़े  त्याचप्रमाणे पांझरा नदीपात्रात दोन्ही बाजूला प्रत्येकी साडेपाच किमीचे रस्ते आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून प्रस्तावित करण्यात आले असून सदर कामे रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याने पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ सभेत तब्बल 30 विषयांवर चर्चा होणार आह़े