शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तरस व शेळी मृतावस्थेत आढळली

By admin | Updated: February 12, 2017 01:03 IST

वैजाली-प्रकाशा रस्ता : वाहनाच्या धडकेने तरस ठार झाल्याचा अंदाज

प्रकाशा : वैजाली- प्रकाशा रस्त्यावर शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तरस मृतावस्थेत आढळून आला तर रस्त्याच्या दुसºया बाजूला शेळीही मृतावस्थेत आढळून आली. वाहनाच्या धडकेने हा तरस ठार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत वृत्त असे की, गेल्या महिनाभरापूर्वी प्रकाशा येथील बॅरेज कॉलनीजवळ तरस आढळून आला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास प्रकाशा-वैजाली रस्त्यावर डाव्या बाजूला तरस मृतावस्थेत आढळून आला. दुसºया बाजूला अर्धवट खाल्लेली शेळीही आढळून आली. याबाबत प्रकाशा दूरक्षेत्राचे पो.कॉ.वंतू गावीत यांना माहिती देण्यात आली. त्यांनी शहादा येथे वनविभागाच्या अधिकाºयांना माहिती दिल्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास वनपाल अनिल बोराडे, किसन वसावे, एस.आर. पाटील, सुभाष मोकाडे, भुरा ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले. मृत झालेल्या तरसाला कोणी घेऊन जाऊ नये म्हणून ते रात्रभर तेथेच थांबून होते. शनिवारी सकाळी वैजाली येथील पशुवैद्यकीय अधिकारी देशमुख यांना बोलविले. त्यांनी तरसाचे जागेवरच शवविच्छेदन केल्यानंतर त्याला जाळण्यात आले. या वेळी वनपाल अनिल बोराडे, वनरक्षक पी.आर. वाघ, मनीषा मराठे, ईलान गावीत, किसन वसावे, एस.आर. पाटील, गुलाबसिंग वसावे, जगन्नाथ कोळी, सरपंच भावडू ठाकरे, रफीक खाटीक, दिलीप चौधरी आदी उपस्थित होते.याबाबत वनक्षेत्रपाल अनिल पवार यांनी सांगितले की, तरस हा आळशी प्राणी असतो. तो सहज मिळेल अशा अन्नाच्या शोधात असतो. त्यामुळे रस्त्यालगतच्या चारीत एक शेळी मृतावस्थेत पडलेली होती. ती खाण्यासाठी आला असावा. त्यादरम्यान या रस्त्यावरून जाणाºया एखाद्या चारचाकी वाहनाच्या आवाजामुळे तो पळताच वाहनाखाली येऊन त्याच्या तोंडाला व मानेला मार लागल्यामुळे तो ठार झाला असावा, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.    (वार्ताहर)