शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दातर्तीजवळ विमानाचे क्रॅश लॅडींग, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 22:32 IST

प्रशिक्षणार्थी विमान : सुदैवाने जिवीतहानी टळली

ठळक मुद्देहे विमान जेव्हा मालपूर - कासारेवरुन गेले तेव्हा ते हेलकावे घेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दातर्तीजवळ आल्यानंतर हे विमान नदीत कोसळले असे वाटत होते. परंतु पायलटने ते आदिवासी वस्तीजवळील मोकळया जागेत क्रॅश लॅडींग केले. विमान कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने आदिवासी वस्तीतील लोक हे घाबरुन नदीकडे पळून गेले.दातर्ती ग्रामस्थ हे जेव्हा विमानाजवळ पोहचले तेव्हा हे विमानातून जखमी कॅप्टन आणि हे सर्व प्रशिक्षणार्थी बाहेर निघाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री :  तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुरतहून धुळ्याकडे येणारे बॉम्बे फ्लार्इंग क्लबच्या प्रशिक्षणार्थी विमानाचे चालकाने साक्री तालुक्यातील दातर्ती गावाजवळ क्रॅश लॅडींग केले. या  दुर्घटनेत पायलट जे.पी. शर्मा किरकोळ  जखमी झाले. सुदैवाने विमानात पायलट सोबत असलेले अन्य पाच जण सुखरुप आहेत.   क्रॅश लॅडींगचा आवाज झाल्याने घटनास्थळी दातर्ती ग्रामस्थ मदतीला धावून गेले. बॉम्बे फ्लार्इंग क्लबचे धुळ्यात गोंदूर विमानतळावर प्रशिक्षण केंद्र आहे. क्लबचे सायंकाळी सुरतहून   धुळ्याकडे निघालेले विमान हे   पायलट जे़ पी़ शर्मा चालवित होते. त्याच्यासोबत त्यांचे सहकारी  प्रितम सिह (वय ३०), प्रशिक्षणार्थी अखिल ठकीला पती (२०), अशना मोहम्मद अन्सारी (२४), प्रणवसिंह (२८), तेजस रवी (वय ३०)  असे सहा जण विमानात होते. रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील दातर्ती शिवारात हे विमान येताच विमानात तांत्रिक बिघाड झाला़  प्रसंगावधान राखत पायलट शर्मा यांनी तात्काळ निर्णय घेत हे विमान गावात न उतरविता गावालगत मोकळ्या जागेत क्रॅश लॅडींग केले़ क्षणार्धात निर्णय नसता घेतला तर हे विमान गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीला धडकले असते़ यात मोठी दुर्घटना घडली असती़ सुदैवाने तसे झाले नाही़ विमान कोसळल्याची बातमी दातर्ती ग्रामस्थांनी    घटनास्थळी धाव घेतली़ परंतु विमानातून पायलट व अन्य प्रशिक्षणार्थी स्वत:च बाहेर आले.  बराच वेळ होऊनही याठिकाणी प्रशासनातील कोणीही फिरकले नव्हते़ तब्बल अर्धा ते पाऊण तासाने त्याठिकाणी पोलीस पोहचले. किरकोळ जखमी पायलट शर्मा आणि अन्य जणांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ शर्मा यांना किरकोळ दुखापत झाली असून सर्वांची प्रकृती ठीक आहे़  प्राथमिक उपचार केल्यानंतर हे सर्व कारने धुळ्याकडे रवाना झाले आहे.