लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील वार ते सुट्रेपाडा रस्त्यावरील एका शेतात नागरीकांच्या गायी शेतात चरत असताना ज्वारी, बाजरीचे कोंब खाण्यात आल्याने सुमारे २०० गायींना विषबाधा तर ४ गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली शुक्रवारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली़ मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे कापलेल्या ज्वारीला पुन्हा कोंब फुटले होते़ नेमके हेच कोंब अर्थात दुरी गायींच्या खाण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे़ या घटनेबाबत माहिती कळताच रविंद्र शेलार यांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाºयांचे पथक, १५ ते २० गोसेवकांचे पथकासह बाजारातून वैद्यकीय साहित्य घेवून घटनास्थळी पोहचले. गायींना वाचविण्यासाठी दिवसभर प्रयत्नांची शिकस्त करुन या रणरणत्या उन्हात जीवन मृत्यूशी झुंज देणाºया, मदतीची वाट पाहणाºया गायींचे प्राण वाचविण्यात यश आले. परंतु चार गायींना शर्थीचे प्रयत्न अपुरे पडल्याने त्यांचा जीव वाचविण्यात यश आले नाही़ उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू ओढवला आहे़ याशिवाय १० ते १२ गायींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट असताना पशुपालक शेतकºयांच्या पशुधनाचे नुकसान म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ आहे़ भरपाईची मागणी केली जात आहे. आलेल्या संकटांना घाबरुन शेतकºयांनी आपले गोवंश बाजारात विकू नये. काहीही मदत लागल्यास आपल्याशी जरुर संपर्क साधावा़ अपघातामुळे हवालदिल झालेल्या शेतकºयांना मदतीचा हात देण्यासाठी कटिबध्द असून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. - रविंद्र शेलारद्वारकाधीश प्रतिष्ठान, धुळे
शेतात दुरी खाल्ल्याने गुरांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:23 IST