शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील डोमकानीतील शेतात बिबट्याने रात्री पाडला गायीचा फडशा: 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 12:21 IST

दुसºया गायी, बैलांना पंजा मारून केले जखमी

ठळक मुद्देगोठ्यात बांधलेल्या गुरांवर हल्ला, दोर न तुटल्याने गायीचा पडला फडशाबिबट्याकडून अनेक दिवसांपासून हल्ल्याचा प्रयत्न, रविवारी यशस्वी परिसरात उमटले पायाचे ठसे, पंचनाम्यासाठी शेतकरी प्रयत्नशील 

निजामपूर : महिन्याभराच्या अंतरानंतर डरकाळ्या फोडणारा बिबट्या पुन्हा सक्रिय झाला आहे. धुळे जिल्ह्यातील डोमकानी (ता.साक्री) शिवारात असलेल्या वासखेडी येथील शेतकरी उमेश शामराव दहिते यांचे शेतातील गोठ्यातील गायीवर हल्ला करून तिचा फडशा पाडला. रविवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. वीज पुरवठा रविवारी दिवसा व रात्री बंद ठेवला जातो. त्यामुळे शेतकरी रात्री शेतात थांबत नाहीत. उमेश दहिते यांच्या शेतात दूध धुवून आनंदा दहिते हे घरी गोंधळ असल्याने घरी निघून गेले. आजूबाजूचे शेतकरीही वीज नसल्याने शेतात नव्हते. ही संधी साधून बिबट्याने रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गायींच्या गोठ्यावर हल्ला चढविला. या गोठ्यात अनेक गायी, बैल व घोडा होता. काही गायी, बैलांना बिबट्याने आपल्या पंजाच्या सहाय्याने बोचकून जखमी केले आहे. घोडा लांब बांधला होता. घोड्याने बिबट्यास खूप पळवले. पण घोडा सापडत नाही म्हणून बिबट्याने त्या जनावरांमधील एका गाईवर हल्ला केला. तिने जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु  बांधलेला दोरच न तुटल्याने बिबट्याच्या हल्ल्यात त्या गाईचा फडशा पडला. बिबट्या तेथे आल्याच्या व नंतर दुसºया शेताकडे गेल्याच्या पाऊलखुणा परिसरात जागोजागी उमटल्या आहेत. आनंदा दहिते यांनी सांगितले की बिबट्या अनेक दिवसांपासून आजूबाजूस दुरून डरकाळ्या फोडायचा. पण शेतात शेतकरी व मजुरांचा वावर तसेच दिवे सुरू राहत असल्याने त्यास हल्ला करणे जमत नव्हते. मात्र रविवारी वीज नसल्याचा फायदा त्याने उचलला.दहिते यांनी कोंडाईबारी वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधला असून मृत गायीचा पंचनामा करण्यात यावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.