शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरातील जिल्हा कारागृहाच्या जागेची मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 12:36 IST

आमदार अनिल गोटेंची उपस्थिती, रस्त्यासाठी जागा वर्ग

ठळक मुद्दे- रस्ता रूंदीकरणासाठी जागेची आखणी व मोजणी - शासनाच्या आदेशानुसार जागा बांधकाम विभागाकडे वर्ग- ९८३़६५ चौमी जागेवरून होणार रस्त्याचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील जिल्हाधिकारी निवासस्थानाशेजारी असलेल्या जिल्हा कारागृहाच्या मालकीच्या जागेपैकी ९८३़६५ चौमी इतके जमीन क्षेत्र रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाने काढले होते़ त्यानुसार जागा बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाली असून शनिवारी या जागेची मोजणी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत करण्यात आली़शहरातील जिल्हाधिकारी निवासस्थानाशेजारी धुळे जिल्हा कारागृहाच्या मालकीची सिटी सर्व्हे क्रमांक ३५४५-अ मधील ९८३़६५ चौमी जागा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केल्यानुसार त्यांना उपलब्ध करून देऊन, चेनलिंक फेंन्सिंग करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता़  त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केलेले क्षेत्र ९८३़६५ चौमी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकारजमा करण्यात यावे, अशी विनंती महसूल विभागाने केली होती़ त्यानुसार, गृह विभागाने तीन अटींच्या अधिन राहून जमीन बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्याचे आदेश दिले होते़ दरम्यान, सदर जागा महसूल विभागाकडे प्रत्यार्पित होऊन बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली़ त्यानंतर शनिवारी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत संबंधित जागेची आखणी व मोजणी करण्यात आली़ तसेच बंदीवानांनी यावेळी आखणीच्या ठिकाणी खोदकामही केले़ यावेळी तेजस गोटे, जिल्हा कारागृह अधीक्षक वैभव आगे, भिमसिंग राजपूत,  योगेश मुकुंदे, अमोल मराठे, दिपक पाटील व अधिकारी उपस्थित होते़ यावेळी संबंधित जागेवर वाढलेली झाडेझुडपे जाळण्यात आली़  आता शासनाच्या आदेशानुसार रस्ता रुंदीकरणासाठीची जागा वगळून उर्वरित जागेस संरक्षण भिंत उभारण्यासह उर्वरीत अटींची पूर्तता केली जाणार आहे़  तसेच रस्ता रुंदीकरणाच्या कामासही सुरुवात केली जाणार आहे़